सोलापूर : मुख्याध्यापकाकडे पद स्थापनेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या जिल्हा परिषदेतील कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याला बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. तीन दिवसातील ही दुसरी कारवाई केली आहे.
सुहास अण्णाराव चेळेकर असे अँटिकरप्शनने अटक केलेल्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याचे नाव आहे. आज बुधवारी (ता. १०) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही कारवाई झाली.
यातील तक्रारदार यांनी राज्यसरकारच्या पती-पत्नी एकत्रीकरण योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करणेकरीता यातील आरोपी लोकसेवक यांनी २५ हजार रुपये लाचेची मागणी करीत असलेबाबत ॲन्टी करप्शन ब्युरो, सोलापूरकडे तक्रार दिली होती.
तक्रारदार यांनी जवळच्या रिक्त शाळेत मुख्याध्यापक पदी बदली होणेकरीता अर्ज दिला होता. सदर अर्जावर मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे ८ सप्टेंबर २०२१ रोजी तक्रार प्राप्त झाली होती. सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता यातील आरोपी करून, तडजोडी अंती १५,००० रु. लाच मागणी केली आहे. याची शहानिशा झाल्यानंतर बुधवारी अँटी करप्शन विभागाच्या पथकाने या प्रकरणात आरोपी लोकसेवक सुहास चेळेकर यांना अटक केली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये केवळ तीन दिवसात ही अँटी करप्शन ची दुसरी कारवाई आहे. समाज कल्याण विभागातील कक्ष अधिकारी स्वामी यास तीस हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. या घटनेमुळे बुधवारी पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडाली.
ही कारवाई संजीव पाटील (सहा. पोलीस आयुक्त लाप्रयि,सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर,पोलीस अंमलदार पोना प्रमोद पकाले, पोना अतुल घाडगे, पौकों गजानन किणगी, चापोकों शाम सुरवसे यांनी पार पाडली.
* बालकाचा मृतदेह घरात पाण्याच्या ड्रममध्ये मिळाला, मंगळवेढेकर चाळीतील घटना
सोलापूर : लकी चौकातील रोडगे-मंगळवेढेकर चाळ येथे राहणाऱ्या – संकेत सुरवसे यांच्या १५ दिवसीय मुलाचा मृतदेह घराबाहेरच्या पाण्याच्या ड्रममध्ये आढळून आला. ही घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली. या ठिकाणी नागरिकांनी हळहळ करीत मोठी गर्दी केली होती. मुलाचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे लगेचच स्पष्ट झालं नाही. फौजदार चावडी पोलीस याचा तपास घेत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मंगळवेढेकर चाळ येथे राहणाऱ्या संकेत सुरवसे यांच्या पत्नीनं १५ दिवसापूर्वी एका मुलास जन्म दिला. या दांपत्याला आधी एक वर्षाचा मुलगा आहे. संकेत है पत्नी, दोन मुलं आणि आईसह या ठिकाणी राहतात. काल रात्री संकेत हे नोकरीसाठी बाहेर गेले होते. त्यावेळी घरात त्यांची वृद्ध आई आणि पत्नी तसेच दोन लहान मुलं होते. १५ दिवसाचं बालक आईच्या कुशीत झोपलं होतं. आज सकाळी संकेत घरी आला तेंव्हा मुलगा पाळण्यात दिसला नाही.
त्यांनी पत्नीकडे चौकशी केली, मुलाचा शोध सर्वांनीच सुरु केला. काही वेळातच पाण्याच्या ड्रममध्ये मुलगा मृतावस्थेत तरंगताना आढळून आला. ही घटना समजताच चाळकरी आणि परिसरातील नागरिकांनी हळहळ करीत सुरवसेंच्या घराकडे धाव घेतली. पोलीसांनाही पाचारण करण्यात आलं. शववाहिकेतून मृतदेह सिव्हिलकडे पाठविण्यात आला.
पोलीसांनी घरातील संकेत, त्यांची पत्नी, आई अशा सर्वांची कसुन चौकशी सुरु केली आहे. सध्य स्थिती आकस्मित मयत अशी नोंद सिव्हिल पोलीसात झाली आहे. बंद दाराआड लहान बालक आईच्या कुशीत झोपलं असताना ड्रमपर्यंत पोहचलं कसं या विषयी उलटसुलट चर्चा सुरु आहे.