बार्शी : पत्नी नांदत नसल्याचा राग मेहुणी असलेल्या भावजयीवर काढून तिला मारहाण केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील साकत येथे घडला आहे. याबाबत विनोद महादेव मोरे याच्याविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विनोद आणि शरद हे सख्खे भाऊ आहेत. या दोघांच्या पत्नी या सख्ख्या बहिणी आहेत. दोघेही भाऊ वेगवेगळे पण एकमेकाच्या शेजारी राहत आहेत. विनोदची पत्नी त्याच्याजवळ राहत नाही, ती माहेरी राहते. त्यामुळे दुपारी 1 च्या सुमारास त्याने भावाच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी भावजय व मुलगा घरात होते. त्याने तुझी बहिण इथे राहत नाही. ती इथे का राहत नाही. तू पण इथे रहायचे नाही.
तुझ्या बापाच्या घरी खूप इस्टेट आहे. तुझा पसारा घेवून तू पण जा. यापुर्वी तू माझ्या हातातून वाचली आहे. आता तुला सोडत नाही, असे म्हणून मारहाण करत त्या दोघांना घराबाहेर काढले. त्याच्या भितीने ते जवळच्या पडक्या घरात लपून राहिले. नंतर पती आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना तक्रार दिली.
* दुचाकीने धडक दिल्यामुळे वृध्द जखमी
बार्शी : रात्रीच्या सुमारास भजन कार्यक्रमासाठी जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीने जोरात धडक दिल्याने वृध्द गंभीर जखमी झाल्याची घटना गौडगाव येथे घडली आहे. याबाबत जखमी विठ्ठल बापु आरगडे (वय 70 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दुचाकीचालक साहेबराव उर्फ पांडुरंग बाबुराव सानप (रा. भालगाव ता. बार्शी ) याच्याविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विठ्ठल आरगडे हे गावातील शिवाजी देशमुख यांचे घरी भजनाचा कार्यक्रम असलेने त्यांचे घरी रात्री आठच्या सुमारास पायी चालत जात होते. ते प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरुन जात असताना पाठीमागून आलेल्या आरोपीच्या दुचाकीने त्यांना जोरात धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले. त्यांच्या डावे पायास, मनक्यास, डावे हातास, डोकीस जबर मार लागला. त्यामुळे ते बेशुध्द झाले.
अपघातानंतर गोळा झालेल्या लोकांनी त्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलविले. दुचाकी चालक साहेबराव सानप याच्याविरोधात हयगयीने, अविचाराने दुचाकी चालवून, रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन धडक देवून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
* वरवडे येथे तलवारीने हल्ला
सोलापूर – वरवडे (मोहोळ) येथे भावकीतील शेतजमिनीच्या वादातून तलवार आणि हाताने केलेल्या मारहाणीत प्रभाकर बाबुराव जाधव (वय ६०) हे गंभीर जखमी झाले. घटना बुधवारी (ता. १०) सकाळच्या सुमारास घडली. त्यांना टेंभुर्णी येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रभाकर जाधव हे सकाळी ७ वाजेच्या सुमारास आपल्या शेतात काम करीत होते. त्यावेळी रामचंद्र जाधव आणि अन्य तिघांनी त्यांना मारहाण केली .अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
* विडी घरकुल येथे दगडाने मारहाण
विडी घरकुल येतील मारुती मंदिराजवळ विनाकारण दगडाने केलेल्या मारहाणीत संतोष पिराजी पंगुडवाले ( वय ५० रा. गोंधळीवस्ती) हे जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता. ९) सायंकाळच्या सुमारास घडली. पंगुडवाले हे मारुती मंदिराजवळून पायी जात होते. त्यावेळी मनोहर शिंदे यांनी त्यांना मारहाण केली, अशी नोंद एमआयडीसी पोलिसात झाली आहे.
You have observed very interesting details ! ps decent internet site .
I do accept as true with all of the ideas you have offered on your post. They’re really convincing and will certainly work. Nonetheless, the posts are too short for newbies. May just you please extend them a little from next time? Thank you for the post.