सोलापूर : सोलापूर श्रमिक पत्रकार संघ , सोलापूर तसेच सुसंवाद, माजी विद्यार्थी संघटना, मास कम्युनिकेशन विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ नोव्हेंबर २०२१रोजी सकाळी ११ वाजता ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या ॲम्फी थिएटर मध्ये होणार आहे.
प्रिसिजन फाउंडेशन, सोलापूर अध्यक्षा डॉ. सुहासिनी तसेच बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस राहणार आहेत. या कार्यक्रमास डॉ. सुरेश पुरी, परीक्षा मंत्री, हिंदी प्रचार सभा, हैद्राबाद यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. डॉ. आलोक जत्राटकर, जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या ग्रंथावर भाष्य करणार आहेत.
‘जनसंपर्काचे अंतरंग’ या ग्रंथाचे प्रकाशक शशिकांत पिंपळापुरे हे समारंभास उपस्थित आहेत. जनसंपर्काच्या संदर्भात मराठीत खूप कमी ग्रंथ उपलब्ध आहेत. ही उणीव लक्षात घेऊन जनसंपर्काचे अंतरंग या ग्रंथाचे प्रकाशन आम्ही केले. या ग्रंथांमध्ये जनसंपर्क तसेच कार्पोरेट जनसंपर्क याच्याशी निगडित सर्व पैलूंची तपशीलांसह माहिती आहे. जनसंपर्काचे विदयार्थी तसेच सर्वच क्षेत्रातील संस्थासाठी हा ग्रंथ उपयुक्त ठरेल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रकाशन समारंभास जनसंपर्क तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे तसेच सुसंवाद या मास कम्युनिकेशन विभागाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अजित बिराजदार यांनी केले आहे.
* लेखक डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्याविषयी
‘जनसंपर्काचे अंतरंग’ या ग्रंथाचे लेखक डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी बारा वर्षे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे विद्यापीठाचे पहिले जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्य केले. न त्यानंतर मागील तेरा वर्षांपासून डॉ. चिंचोलकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असून, जनसंपर्क विषयाच्या अध्यापनाचे कार्य करतात. पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया या देशस्तरीय जनसंपर्क संस्थेच्या सोलापूर शाखेचे डॉ. चिंचोलकर अध्यक्ष आहेत.
I am so happy to read this. This is the type of manual that needs to be given and not the random misinformation that is at the other blogs. Appreciate your sharing this greatest doc.
It¡¦s really a nice and helpful piece of info. I am glad that you shared this useful information with us. Please keep us up to date like this. Thanks for sharing.
Many thanks for creating this place wonderful, i need to say i appreciate all of the exertions that you just do on this great website.
I enjoy you because of each of your labor on this web site. My niece takes pleasure in getting into research and it is simple to grasp why. My partner and i know all of the dynamic tactic you render simple tricks via your blog and in addition recommend response from other people on that topic while our favorite princess is certainly learning a lot of things. Enjoy the remaining portion of the new year. You’re the one carrying out a superb job.
100317 450059Would really like to perpetually get updated great weblog ! . 698036