सोलापूर – हत्तुर (ता.दक्षिण सोलापूर ) येथे पूर्वीच्या भांडणातून चंद्रकांत नाईकवाडी या मजुराचा सत्तुर ,काठी आणि दगडाने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून हनमंत यल्लप्पा नाईकवाडी ( वय५०) त्याचा मुलगा प्रकाश नाईकवाडी ( वय१९ दोघे रा. हत्तुरगाव )विठ्ठल भिमशा नाईकवाडी ( वय६३ ) त्याचा मुलगा खाजप्पा नाईकवाडी (वय २८ दोघे रा. दुधनी ता.अक्कलकोट) आणि सिद्धण्णा बसवराज दोडमनी (वय २३ जेवरगी जि . गुलबर्गा )अशा पाच जणांना ७ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी २ हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी नुकतीच सुनावली.
या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी, ६ जुलै २०१७ रोजी सकाळच्या सुमारास जखमी चंद्रकांत नाईकवाडी वय (२७ ) आणि त्याचा भाऊ श्रीशैल नाईकवाडी हे दोघे हत्तुर येथील शफीक शेख यांच्या शेतात गवत काढण्याचे काम करीत होते. तेंव्हा शेजारील शेतात वरील आरोपी हे देखील काम करीत होते. त्यावेळी त्यांनी पूर्वीच्या भांडणावरून चंद्रकांतला शिवीगाळ करीत होते . शिवीगाळ करू नका असे म्हणतात हनमंत नाईकवाडी यांच्यासह सर्व आरोपींनी त्याच्यावर सत्तूर काठी आणि दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर सर्व आरोपी पळून गेले.
या घटनेची फिर्याद जखमीचा भाऊ श्रीशैल नाईकवाडी यांनी विजापूर नाका पोलिसात दाखल केली होती . या खटल्याचा तपास तत्कालीन सहा.पोलीस निरीक्षक एस.एल. भोसले यांनी करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्यात एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. मूळ फिर्यादी, जखमीची साक्ष आणि सरकार पक्षाने मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींना ७ वर्षाची शिक्षा सुनावली .
या खटल्यात सरकार तर्फे अँड.माधुरी देशपांडे यांनी तर आरोपीतर्फे अँड पी.पी. नवगिरे यांनी काम पाहिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* नशेत बसवर दगडफेक करणार्यांची दहा दिवसानंतर मुक्तता
बार्शी : नशेत एसटी बसवर दगडफेक करणार्या आणि चालकाला मारहाण करणार्या तिघा युवकांना त्यांच्या या गैरकृत्याचा चांगलाच फटका बसला असून दहा दिवस तुरुंगात घालविल्यानंतर त्यांची सशर्त जामीनावर मुक्तता झाली आहे.
लक्ष्मण नवनाथ शिंदे (रा. एस.टी.स्टँडसमोर, कुर्डूवाडी ता.माढा), आषिकेष दिलीप गवळी (रा. खाडे एंटर प्राईजेस समोर, राधा कृष्णा नगर, कुर्डूवाडी ता.माढा) , सिध्दार्थ विजय चव्हाण (रा. वागळे हस्पीटल समोर, कुर्डूवाडी ता. माढा) अशी या युवकांची नावे असून त्यांना 29 ऑक्टोंबर रोजी अटक झाली होती. चालक रामु हरीभाऊ कोवे (रा. एस.टी. कॉलनी, अकलूज ता. माळशिरस) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन त्यांच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपींनी पराग हॉटेलमध्ये दारू झोकून नशेत काही कारण नसताना हे कृत्य केल्याचे नंतर उघड झाले. अकलूज आगाराची लातूर-अकलूज ही बस बार्शीमार्गे कुर्डवाडीला निघाली होती. ती खांडवीच्या पुढे असलेल्या पराग हॉटेल परमिट रुमजवळ आली असता तेथे उभ्या असलेल्या आरोपींपैकी एकाने बसच्या काचेवर दगड फेकून मारला आणि ते हॉटेल समोर आपली मोटरसायकल लावून आतमध्ये पळून गेले.
या दगडफेकीत बसची समोरील काच फुटल्यामुळे चालक रामू कोवे यांनी तत्काळ बस थांबविली आणि खाली उतरुन पराग हॉटेलमध्ये जावून युवकांच्या मोटारसायकलीचा आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढला. यावेळी दगडफेक करणारांचे फोटो ते काढू लागल्याने त्यांनी तुम्ही फोटो का काढला? असे म्हणून त्यांना मारहाण केली. यावेळी वाहक गारडे हे सोडवण्यासाठी आले असता त्यांना देखील त्यांनी मारहाण केली. यावेळी बसमधील प्रवाशांनी खाली उतरून चालक-वाहकांची सोडवणूक केली. या हल्ल्यात बसची काच फुटून 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.