Sunday, May 29, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

पंढरपूर बसस्थानकातून खाजगी प्रवासी वाहतूक सुरु, जादा पैसे घेतल्यास होणार कठोर कारवाई

Surajya Digital by Surajya Digital
November 12, 2021
in Hot News, सोलापूर
9
पंढरपूर बसस्थानकातून खाजगी प्रवासी वाहतूक सुरु, जादा पैसे घेतल्यास होणार कठोर कारवाई
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर : मागील आठ दिवसापासून एसटी बस कर्मचा-यांचे आंदोलन सुरु आहे. यामुळे राज्यभरातील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याचबरोबर खाजगी प्रवाशी वाहतूक करणारे वाहनचालक जादा पैसे घेवून प्रवाशांची लुट करीत होते. याची दखल घेवून सोलापूर प्रादेशिक परिवहन विभागाने खाजगी वाहनांमधून प्रवाशी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. मात्र एस टी बसच्या तिकीटापैक्षा जादा पैसे घेतल्यास प्रवाशांनी   (0217- 2303099) या फोनवर तक्रार करावी. यानंतर संबंधित वाहनासह वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मोटार वाहन निरीक्षक महेश रायबान यांनी सांगितले.

आज शुक्रवारी सकाळी पंढरपूर बसस्थानकातून खाजगी प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली. यावेळी मोटार वाहन निरीक्षक महेश रायबान, सुखदेव पाटील, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सिध्दराम कोलाटे, ऐश्वर्या धलू, धीरज डोईफोडे आदी उपस्थित होते.

* 3 हजार 289 पोलीस अधिकारी व कर्मचारी, दोन एसआरपीएफ तुकडी, सहा वॉच टॉवर  

पंढरपूर : कार्तिक शुद्ध एकादशी 15 नोव्हेंबर  रोजी असून, या कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. वारीत  येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षितपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोरोना संर्गाच्या पार्श्वभूमीवर कार्तिक वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी  3 हजार 289 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये 15 पोलीस उपअधिक्षक, 41 पोलीस निरिक्षिक, 178 सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस  उपनिरिक्षक, 1 हजार 955 पोलीस कर्मचारी व 1 हजार 100 होमगार्ड तसेच दोन एसआरपीएफ कंपनीच्या तुकड्या नियुक्त करण्यात आल्या आहेत.

वारीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात येत असून,त्यांना आरोग्य सुरक्षिततेसाठी प्रथमोपचार किट देण्यात येत आहे. वारी कालावधीत  गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी  नदीपात्र, 65 एकर, महाव्दार, महाव्दार घाट, पत्राशेड या सहा  ठिकाणी वॉच टॉवर करण्यात आले आहेत.  तसेच नदीपात्रासह नव्याने नगर प्रदक्षिणा मार्ग, मंदीर परिसर येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचेही उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी सांगितले.

वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशान्वये  जड वाहतुक शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे . तसेच वाहतुक नियमनासाठी  12 ठिकाणी  डायव्हरशन पॉईट व दोन ठिकाणी नाकाबंदी पाँईंट सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर  खाजगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी  15 ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली असून  या वाहनतळांवर सुमारे पाच हजार  पेक्षा अधिक वाहने  पार्क करण्याची क्षमता  असल्याचेही श्री.कदम यांनी  सांगितले. भाविकांनी तसेच नागरिकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनास सहाकार्य करावे  असे, आवाहनही  उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी केले आहे.

Tags: #Privatepassenger #transport #started #Pandharpur #busstand #strictaction #money#पंढरपूर #बसस्थानक #खाजगीप्रवासी #वाहतूक #जादापैसे #कठोरकारवाई
Previous Post

पूर्ववैमनस्यातून सत्तूरने खुनाचा प्रयत्न ; पाच जणांना ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Next Post

पहिल्या टेस्टसाठी अजिंक्य रहाणे कॅप्टन, न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्टसाठी भारतीय संघाची घोषणा

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
पहिल्या टेस्टसाठी अजिंक्य रहाणे कॅप्टन, न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्टसाठी भारतीय संघाची घोषणा

पहिल्या टेस्टसाठी अजिंक्य रहाणे कॅप्टन, न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्टसाठी भारतीय संघाची घोषणा

Comments 9

  1. cobra mx534sph review says:
    4 months ago

    Super info it is actually. My friend has been seeking for this information.

  2. Melody Saucer says:
    4 months ago

    thank you for such a fantastic site. Where else could anyone get that kind of information written in such a perfect way? I have a presentation that I am presently working on, and I have been on the look out for such information.

  3. Courtney Johanek says:
    3 months ago

    You should consider taking part in a contest for one of the best blogs on the web. I will suggest this websites!

  4. Lorene Stain says:
    3 months ago

    I like the helpful information you provide in your articles. I will bookmark your weblog and check again here frequently. I am quite certain I will learn plenty of new stuff right here! Good luck for the next!

  5. slot999 says:
    3 months ago

    895774 449366You need to take part in a contest for among the top blogs on the internet. I will suggest this internet internet site! 551038

  6. 레깅스룸 says:
    3 months ago

    673533 147605Looking forward to see you. 658382

  7. http://tinyurl.com/yb5yrqkk says:
    2 months ago

    You’re so interesting! I do not suppose I’ve read through something like that before.

    So good to discover somebody with a few genuine thoughts on this issue.
    Really.. thank you for starting this up. This web site is something that’s needed on the internet, someone with a little originality!

  8. last minute flights says:
    2 months ago

    Peculiar article, just what I wanted to find.

  9. cheapest airfare guaranteed says:
    2 months ago

    Wonderful site. A lot of useful information here. I’m sending
    it to several buddies ans also sharing in delicious.
    And obviously, thanks for your sweat!

वार्ता संग्रह

November 2021
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Oct   Dec »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697