मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 14 दिवसानंतर पहिली एसटी बस धावली आहे. त्यामुळे एसटीच्या काही कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली असल्याचं चित्रं निर्माण झालं आहे. 17 डेपोतून या बसेस सोडल्या. एकूण 900 लोकांनी एसटीतून प्रवास केला. खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट होऊ नये यासाठी आम्ही एसटी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, असं एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितलं.
मुंबई सेंट्रलमधून पहिली एसटी साताऱ्याच्या दिशेने रवाना झाली. तर 826 एसटी रस्त्यावर धावत असल्याचं एसटी प्रशासनाचं म्हणणं आहे.
त्यामुळे एसटी कामगारांच्या संपात फूट पडल्याचं चित्रं निर्माण झालं आहे. आज 36 बसेस आम्ही विविध डेपोतून सोडल्या. 17 डेपोतून या बसेस सोडल्या. एकूण 900 लोकांनी एसटीतून प्रवास केला. खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट होऊ नये यासाठी आम्ही एसटी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, असं एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितलं.
राज्यातील काही भागात एसटी सेवा सुरू झाली आहे. मुंबई आगारातून आज दुपारी 2 वाजून 30 मिनिटाने एमएच 20 बीएल 3954 क्रमांकाची एसटी धावली. चालक आर. आर. देवरे आणि वाहक एस. एस. माने यांनी डेपोतून ही एसटी काढली. ही एसटी साताऱ्याच्या दिशेने निघाली होती. तर अक्कलकोट आगारातूनही काही बसेस सुटल्या. इस्लामपूर-वाटेगाव ही पहिली बस मार्गस्थ झाली. अक्कलकोट ते सोलापूर, सोलापूर ते अक्कलकोट अशा दोन ट्रीपही या बसच्या झाल्या. या एसटीतून 75 प्रवाशांनी प्रवास केला. तसेच रत्नागिरी विभागातील राजापूर आगारातून बुरुंबेवडी वस्ती हातदे ही एसटी रवाना झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, राज्यातील एसटी कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास सरकार सदैव तयार आहे मात्र याबाबतचा कोणताही तोडगा न्यायालयाच्या परवानगीशिवाय काढता येणे शक्य नसल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
श्री. परब यांनी गरीब कामगाराच्या रोजगाराची चिंता असल्याने त्यांच्यावर कारवाई न करता संरक्षण देन्याची सरकारची तयारी आहे मात्र त्यांनी कामावर रूजू व्हावे, असे आवाहन काल पुन्हा केले आहे. दरम्यान आझाद मैदान येथे भाजप नेत्यांसोबत बसलेल्या कामगारांची संख्या आज निम्म्याने कमी झाल्याचे दिसली. विलीनीकरणाच्या मागणीसाठी 14 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
संपाची तीव्रता पाहता एसटी महामंडळाने एकीकडे संप मोडीत काढण्यासाठी निलंबनाच्या कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे गुरुवार (ता. 11) पर्यंत 29 विभागातील 1 हजार 135 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. आतापर्यंत एकूण निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 2 हजार 53 पर्यंत पोहोचली आहे. निलंबनाच्या कारवाईमुळे राज्यातील काही कामगारांनी पुन्हा कर्तव्यावर परतण्यास तयार असल्याचा दावा केल्याचे महामंडळाकडून सांगण्यात येत आहे. त्यांना संरक्षण देवून पुन्हा कामाला दाखल करून घेतले जाईल असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले.