यवतमाळ : यवतमाळमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथील नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण सभापती म्हणून काम केलेल्या नगरसेविकेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सुरेखा मोहन मेंडके (वय 35) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरेखा मेंडके यांनी काँग्रेस कडून 2016 मध्ये निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. आत्महत्येचे कारण अद्याप कळाले नाही.
सुरेखा मोहन मेंडके यांनी राहत्या घरी दुपारच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरेखा मेंडके यांनी काँग्रेसकडून २०१६ मध्ये प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्या मोठ्या माताधिक्याने विजयी झाल्या होत्या. त्यानंतर सुरूवातीला महिला व बालकल्याण उपसभापती म्हणून काम करण्याची संधीही त्यांना मिळाली होती.
नगरसेविका सुरेखा मेंडके या आर्णी येथील नारायणलीला ले आऊट मध्ये रहात होत्या. मात्र रविवारी दुपारच्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमुळे यवतमाळच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळाले नाही. पुढील तपास आर्णी पोलिस करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* मंगळवेढा येथे कोयत्याने खुनाचा प्रयत्न, आरोपीला ५ दिवसाची कोठडी
सोलापूर : मंगळवेढा-येथील आयसीआयसीआय बँकेचे जवळ भरदिवसा कोयत्याने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या रामेश्वर महादेव कोळी (वय ३०रा. उचेठाण) याला पोलिसांनी अटक केली. त्याला ५ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने शनिवारी दिला .
शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास रामेश्वर कोळी याने पूर्वीच्या भांडणावरून गजेंद्र महादेव शिवपुजे ( वय २९ रा. मुढवी) याच्यावर कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केले होते .त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवेढ्याच्या पोलीसांनी रामेश्वर कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली .सहाय्यक निरीक्षक पिंगळे पुढील तपास करीत आहेत .