सोलापूर : वर्ल्ड कप टी-ट्वेंटीच्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या फायनल मॅचमध्ये सट्टा घेणाऱ्या सोलापुरातील सहा जणांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
वर्ल्ड कप टी-ट्वेंटीच्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या फायनल मॅचमध्ये सट्टा घेणाऱ्या सोलापुरातील सहा जणांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
सचिन अंबादास कमलापुरे (वय – ३१ वर्षे रा. ४१९ साखरपेठ, सोलापूर सध्या घोंगडे वस्ती सोलापूर), मुकुंद अंबादास कमलापुरे (वय २६ वर्षे रा.४१९ साखरपेठ, सोलापूर सध्या घोंगडे वस्ती सोलापूर), दत्तात्रय पिट्टाप्पा बडगंजी (वय-३५ वर्षे रा.२७२८ जी ग्रुप वैष्णवी नगर, मारुती मंदिर जवळ, जुने विडी घरकुल सोलापूर), चणाप्पा सिध्दाप्पा पुरानिक (वय-३१ वर्षे रा.३३/३/७७ न्यु पाच्छापेठ, विजय नगर, सोलापूर सध्या-बोळकोटे नगर, सोलापूर), श्रीनिवास मुरली चिंता (वय-२६ वर्षे रा.३५५ पिट्टा नगर, जुने विडी घरकुल सोलापूर) व सतिश श्रीनिवास मंगलपल्ली (वय २७ वर्षे रा.१६६ राघवेंद्र नगर, जुने विडी घरकुल सोलापूर) या सहाजणांना ताब्यात घेतले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’ वरही उपलब्ध
रविवारी २०-२० वर्ल्डकपची फायनल मॅच ऑस्ट्रेलीया विरूध्द न्यूझीलंड या दोन संघात झाली. या फायनल क्रिकेट सामन्यांवर सचिन कमलापुरे व मुकुंद कमलापुरे असे दोघे भाऊ मोबाईल द्वारे सट्टा खेळण्यास लोकांना प्रवृत करुन, स्वताचे आर्थिक फायद्यासाठी लोकांची फसवणुक करून सट्टा घेतात, अशी माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी तात्काळ कारवाई करणे बाबत आदेश दिले.
त्यानुसार पोसई संदिप शिंदे व त्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून या सहाजणांना अटक केली. त्यांचेकडून क्रिकेट बेटींग सट्टा घेण्यासाठी लागणारे साहीत्य रोख रक्कम, सट्टा घेण्यासाठी वापरलेले मोबाईल फोन, टि.व्ही, ०१ मोटार सायकल व इतर साहीत्य असा एकुण ४ लाख ०९ हजार ८००रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
* शेटफळ जवळ अपघात दुचाकी चालक गंभीर
पुणे महामार्गावरील मोहोळ नजीक असलेल्या शेटफळ जवळ वेगाने जाणारी दुचाकी रस्ता दुभाजकावर धडकल्याने प्रदीप पांडुरंग देशमुख (वय २६ रा. नारायणगाव (ता.जुन्नर जि. पुणे ) हा तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. तो सोलापूर येथून पुणे येथे दुचाकीवरून निघाला होता. त्यावेळी हा अपघात घडला. त्याला रुग्णवाहिकेतून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
I love putting together useful information, this particular publish has got me personally a lot more info!
Loving the information on this web site , you have done great job on the posts .