सोलापूर : पद्मश्री पुरस्कार मिळालेली वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावत हिने देशद्रोही विधान करून भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले हे कोणी सांगितले तर मी पद्मश्री पुरस्कार परत करेन, असे स्पष्टीकरण दिले होते.
याबाबत भारतीय स्वातंत्र्याबाबत कंगनाला किती अज्ञान आहे. हे दिसून येते त्यामुळे आज संभाजी ब्रिगेड च्या वतीने कंगनाला भारतीय स्वातंत्र्याचा अभ्यास व्हावा तिच्या ज्ञानामध्ये सुधारणा व्हावी, म्हणून तीला पोस्टाने रजिस्टर करून भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास व लढा अशी पुस्तके घरी पाठविण्यात आली.
कंगनाने भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रनौतने एका कार्यक्रमात उधळली होती. यावरू मोठा वाद निर्माण झाला आहे.
कंगनाने देशाचा अपमान केला असून, तिने माफी मागावी व पद्मश्री पुरस्कार परत करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष सीताराम बाबर, संपर्कप्रमुख दत्ता जाधव, संघटक महेश हिरेमठ , सिद्धाराम सुतार, आली नायकोडी, इब्राहिम शेख, इलियास शेख आदी उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* अपघातात तरूण युवकाचा मृत्यू
सोलापूर : दुचाकीला पाठीमागून दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 12) सोलापूर-अक्कलकोट रोडवरील कुंभारी गावाजवळ घडला.
आसिफ माशाळे असे मयत तरुणाचे नाव असून , सोलापूर जिल्हा परिषदेतील लघुपाटबंधारे विभागाचे कनिष्ठ सहाय्यक कादरसाब माशाळे यांचा तो मुलगा आहे. मयत आसिफ यांची इंटेलिजन्स ब्युरो ऑफ इंडियासाठी निवड झाली होती. महाराष्ट्रातून दोघांची निवड झाली होती. त्यात आसिफचा समावेश होता.
त्याची 150 पैकी 146 मार्कस घेऊन निवड झाली होती. आसिफ हा दुचाकीवर जात असताना ट्रिपल सीटवर वेगाने जाणाऱ्या दुचाकी स्वारांनी पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात असिफचा मृत्यू झाला. कादरसाब माशाळे यांचे ओम गर्जना चौक सैफुल येथे निवास असून दुपारी 4 वाजता अंत्यविधी जुना विजापूर नाका रेल्वे पटरी येथील मुस्लिम कब्रस्तानात होणार आहे.