Friday, May 20, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

एकाच झाडाला गळफास घेत शेतकरी जोडप्याची आत्महत्या

Surajya Digital by Surajya Digital
November 15, 2021
in Hot News, महाराष्ट्र
0
एकाच झाडाला गळफास घेत शेतकरी जोडप्याची आत्महत्या
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर : लातूर तालुक्यातील गादवड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पभूधारक शेतकरी जोडप्यानं एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

राज्यात पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येचा प्रश्न चर्चेत आला आहे. लातूर जिल्ह्यात एका अल्पभूधारक दाम्पत्यानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे.

बळीराम रावसाहेब कदम (वय- ५०रा. गादवड, ता. लातूर ) आणि वैशाली ऊर्फ मंगलबाई बळीराम कदम असे आत्महत्या केलेल्या शेतकरी दाम्पत्याचे नावे आहेत. संबंधित शेतकरी जोडप्यानं नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

गादवड शिवारामध्ये लिंबाच्या झाडाला दोघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. एकाच दिवशी पती- पत्नीने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शनिवारी मुरुड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित शेतकरी जोडप्याने शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सारसा रस्त्यावर असलेल्या त्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पंचनामा करुन पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेत तांदुळजा या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनाकरिता पाठवले. शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार आहेत.

संबंधित शेतकरी जोडप्याने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली. याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.

नातेवाईक आणि आसपासच्या लोकांची चौकशी करत पोलीस नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत. या घटनेचा तपास लातूर पोलीस करत आहेत. मृत शेतकरी दाम्पत्याला दोन एकर शेतजमीन होती. त्यांचा स्वभाव शांत आणि संयमी होता. ते सर्वांबरोबर मिळून मिसळून राहत असल्याचे, अशी माहिती आसपासच्या लोकांनी दिली आहे. अशा या मनमिळावू दाम्पत्याने असा अचानक आयुष्याचा शेवट केल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags: #Farmercouple #commits #suicide #byhanging #sametree#झाड #गळफास #शेतकरी #जोडप्या #आत्महत्या
Previous Post

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा; राज्यात सुख शांती नांदावी

Next Post

महाराष्ट्र किशोर खो खो संघात सोलापूर व उस्मानाबादचे चौघे; सोलापूर कराटेपटूचा हैद्राबादेत सन्मान

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
महाराष्ट्र किशोर खो खो संघात सोलापूर व उस्मानाबादचे चौघे; सोलापूर कराटेपटूचा हैद्राबादेत सन्मान

महाराष्ट्र किशोर खो खो संघात सोलापूर व उस्मानाबादचे चौघे; सोलापूर कराटेपटूचा हैद्राबादेत सन्मान

वार्ता संग्रह

November 2021
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Oct   Dec »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697