सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेतील सर्वात महत्त्वाचा भाग असलेला नंदीध्वज सराव यंदा 1 डिसेंबर पासून सुरू होणार असल्याची माहिती सिद्धेश्वर यात्रेचे मुख्य मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली.
सिद्धेश्वर यात्रेतील मानकर यांची बैठक उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या निवासस्थानी आयोजन केले होते. सिद्धेश्वर यात्रेतील नंदीध्वज सर्वांबाबत प्रत्येक मानकर्यांनी आपले मत व्यक्त केले.
राजशेखर हिरेहब्बू म्हणाले, नंदीध्वज सराव करताना शिस्तीचे पालन करणे महत्त्वाचे आहे पांढरे नेहरू शर्ट, ईजार, टोपी हा ड्रेस कोड असल्याशिवाय सराव करू नये, अशी सूचना केली. तसेच सराव नंदीध्वज घरोघरी पूजा करताना खोबऱ्याच्या हारांची पूजा करू नये. सिद्धेश्वर यात्रेच्या वेळीच पाहिल्या नदीध्वजाला खोबरे हार बांधवे, अशी ताकीत दिली.
यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, कामगार नेते कुमार करजगी, मानकरी जगदीश हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, धनेश हिरेहब्बू, सुदेश देशमुख, रेवण माशाळ, प्रशांत कुरुलकर मारुती बनसोडे तम्मा मसरे सोमनाथ मेंगाणे, सुधीर थोबडे, संदेशभोगडे उपस्थित होते कुमार करजगी यांनी पहिल्या नंदीध्वज आला पंधरा तोळे सोने देणार असल्याची माहिती यावेळी दिली.
पहिल्या आणि दुसर्या नंदीध्वज चे सराव 4 डिसेंबर पासून म्हणजे कार्तिकी अमावस्या पासून सुरू होणार आहे बाळवेस येथील मल्लिकार्जुन मंदिरात पहिल्या व दुसऱ्या सराव नंदीध्वज याचे महापूजा होणार असल्याची माहिती हिरेहब्बू यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* विद्यापीठात पीएचडीकरिता मंगळवारी 795 जागांसाठी मुलाखती
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत पीएचडीच्या 795 जागांसाठी मंगळवारपासून (ता.16) मुलाखती घेतल्या जाणार आहेत. 16 ते 22 नोव्हेंबर असा मुलाखतीचा कार्यक्रम असणार आहे. यंदा वेटिंग यादी न लावता गुणवत्तेनुसार सर्वांनाच प्रवेश दिला जाईल, अशी माहिती प्रशासकीय अधिकारी डॉ. विकास कदम यांनी दिली.
विद्यापीठाच्या माध्यमातून आवडत्या विषयातून संशोधनाची संधी मिळावी म्हणून पुणे, जळगाव, मुंबईसह अन्य विद्यापीठातील उमेदवारांनी पीएचडीसाठी अर्ज केले आहेत. प्रत्येक जागेसाठी तीन उमेदवारांना गुणवत्तेनुसार मुलाखतीची संधी देण्यात आली आहे.
परंतु, मागासवर्गीय प्रवर्गातील काही उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातूनही अर्ज केले असून, त्यांना दोन्हीकडे संधी मिळाली आहे. आता त्या उमेदवारांच्या पसंतीनुसार त्यांना त्या प्रवर्गातून प्रवेश मिळणार आहे. रिक्त जागेवर गुणवत्तेनुसार दुसऱ्या उमेदवाराला संधी मिळेल, असेही कदम यांनी या वेळी स्पष्ट केले. मुलाखतीसाठी परजिल्ह्यातून येणाऱ्यांसाठी विद्यापीठाने राहण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.
दरम्यान, उमेदवारांना हेलपाटे मारायला लागू नयेत म्हणून मुलाखतीचे वेळापत्रक निश्चित करून कमी कालावधीत 2 हजार 385 उमेदवारांच्या मुलाखती उरकण्याचेही नियोजन आहे.