सोलापूर : किशोर-किशोरी गटाची ३१वी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो उना (हिमाचल प्रदेश) येथे २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान होणार आहे. यासाठी महाराष्ट्राचे किशोर व किशोरी खो खो संघ महाराष्ट्र खो खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी जाहीर केले.
या संघात सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी चार खेळाडूंचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील जिशन मुलाणी, मोहन चव्हाण आणि प्राजक्ता बनसोडे या तिघांचा आणि राखीव खेळाडूंमध्ये साक्षी व्हनमाने यांची तर उस्मानाबादच्या सोत्या वळवी, राज जाधव, जितेंद्र वसावे व हाराद्या वसावे यांची निवड झाली आहे.
रविवारी ( दि. १४ नोव्हेंबर) युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे येथे मैदान निवड चाचणीतून हे संघ निवड समिती सदस्य अजित शिंदे (सोलापूर), हरिष पाटिल (नंदुरबार), आनंद पवार (धुळे) व माधवी चव्हाण-भोसले (सातारा) यांनी निवडले.
संघ : किशोर : जिशन मुलाणी, मोहन चव्हाण (सोलापूर), आशिष गौतम (ठाणे), तौफिक तांबोळी (पुणे), ईशांत वाघ ( अहमदनगर), अथर्व पाटील (सांगली), सोत्या वळवी, राज जाधव, जितेंद्र वसावे, हाराद्या वसावे ( उस्मानाबाद), सागर सूनार ( मुंबई उपनगर), नीरज खुडे ( सातारा), राखीव : गोविंद पाडेकर ( नाशिक), आकाश खरात ( सांगली), रोहन सुर्यवंशी (धुळे).
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
किशोरी : सुषमा चौधरी, साई पवार ( नाशिक), प्राजक्ता बनसोडे (सोलापूर), धनश्री कंक, दीक्षा साठे ( ठाणे), सायली कार्लेकर ( रत्नागिरी), अंकिता देवकर, धनश्री करे (पुणे), समृध्दी पाटील, सानिका चाफे (सांगली), संचीता गायकवाड ( सातारा), प्राजक्ता औषिकर (धुळे). राखीव : कौशल्या कहाडोळे (नाशिक), साक्षी व्हनमाने (सोलापूर), किंजल भिकुले (मुंबई).
प्रशिक्षक : प्रफुल्ल हाटवटे (बीड), एजाज शेख (मुंबई). व्यवस्थापक : मंदार परब, प्रियांका चव्हाण (ठाणे), फिजिओ : डॉ. किरण वाघ (अहमदनगर).
* सोलापूर कराटेपटूचा हैद्राबादेत सन्मान
सोलापूर – सोलापूर येथील कराटेपटू विग्नेश सुरवसे यांनी हैद्राबाद येथे ब्लॉक बेल्ट परिक्षेत उत्तीर्ण झाल्याने सन्मान करण्यात आला.
कराटे फेडरेशन ऑफ शोतोकॉन इंडिया सल्लग्नित शोतोकॉन मार्शल आर्ट कराटे अकॅडमी सोलापूर यांच्या नेतृत्वाखालील हैदराबाद हेडकाॅटर येथे 13 व 14 नोव्हेंबर 2021 रोजी बॅंक बेल्ट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी सोलापूर व पुणे या जिल्ह्यातील विद्यार्थी उपस्थित होते.
सोलापुरातील विग्नेश सुरवसे व युवराज सुंटनूर या दोघांनी हैद्राबाद येथील राज्यस्तरीय चॅपियनशीपमध्ये ब्लक बेल्ट ओपन कुमिते या प्रकारामध्ये गोल्ड मिडल प्रात्प केले. ही मॅचेस व परीक्षा ग्रॅण्डमास्टर टेक्निकल डायरेक्टर सिहान गणेश गडीयाराम सर व शोतोकॉन मार्शल आर्ट कराटे अकॅडमी हत्तूरे नगर विमानतळ सोलापूरचे टेक्निकल डायरेक्टर राजेंद्र हक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. यावेळी हा सन्मान करण्यात आला.