जयपूर : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज पहिला T-20 सामना खेळला गेला. यात भारताने ५ गडी राखून विजय मिळवला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर न्यूझीलंडने ५ गडी बाद १६५ धावांचे भारतासमोर आव्हान ठेवले. याच्या प्रत्त्युत्तरादाखल खेळतांना भारताने ३ गडी बाद १६४ धावा केल्या.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज बुधवारी टी२० मालिकेतील पहिला सामना रंगला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावत १६४ धावा केल्या.
सामन्यात भारताने सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघासाठी गोलंदाजीवेळी पहिले षटक टाकण्यासाठी भूवनेश्वर कुमार आला. त्याने त्याच्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलने एक धाव घेतली आणि स्ट्राइकवर डार्ली मिशेल आला.
यानंतर भुवनेश्वरने षटकाचा तिसरा चेंडू टाकला आणि मिशेल सामन्यातील पहिल्याच चेंडूचा सामना करताना विकेट गमावून बसला. आणि तीही अशी तशी नाही तर, भूवीच्या जबरदस्त स्विंगवर तो त्रिफळाचीत झाला. याचबरोबर भवनेश्वरने पहिल्या षटकात मिशेलची विकेट घेताच, आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५० विकेट्सही पूर्ण केल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत भुवनेश्वर सध्या चौथ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी एक पाऊल पुढे आला आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सध्या रविचंद्रन अश्विन आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५८ विकेट्स घेतल्या आहेत.
तर, भारताकडून सर्वाधिक टी-२० विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ६६ विकेट्स घेत जसप्रीत बुमराह विराजमान आहे. दुसऱ्या क्रमांकावर ६३ विकेट्स घेऊन युजवेंद्र चहल आहे. या यादीत पाचव्या क्रमांकावर ४६ विकेट्ससह रवींद्र जडेजा आहे.
दरम्यान, न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात सलामीवीर मिशेल शुन्यावर बाद झाल्यानंतर मार्टिन गप्टील आणि चैंपमेन यांनी चांगली फलंदाजी करत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने भारताला १६५ धावसंख्येचा आव्हान होते.