बुलडाणा : मुंबई राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. दुसरीकडे एसटी कामगारांच्या आत्महत्येचं सत्र थांबत नाहीय. बुलडाण्याच्या खामगाव येथील एसटी डेपोतील मॅकेनिक विशाल अंबालकर या कर्मचाऱ्याने काल रात्री विष प्राशन केले होते. त्याला शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान विशाल अंबालकर यांचा मृत्यू झाला.
एसटीच्या शासकीय विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी कामबंद आंदोलन करत आहेत. मुंबईतल्या आझाद मैदानावर अजूनही आंदोलन सुरुच आहे. तर दुसरीकडे दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस देण्यात आली असून २४ तासात कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दुसरीकडे एसटी कामगारांच्या आत्महत्यांचं सत्र थांबायच नाव घेईना. एसटीचे विलीनीकरण करा या मागणीसाठी खामगाव येथील एसटी डेपोत मॅकेनिक म्हणून काम करणाऱ्या विशाल अंबालकर या कर्मचाऱ्याने काल रात्री विष प्राशन केले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याला तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने तातडीने रात्री उशिरा अकोला येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
उपचारादरम्यान विशाल अंबालकर यांचा मृत्यू झाला. राज्यातील एसटी कर्मचारी आत्महत्येत पुन्हा एका कर्मचाऱ्याच्या आत्महत्येची भर पडली आहे. जिल्ह्यातील एसटी कर्मचारी पुन्हा टोकाचं पाऊल उचलत असल्याचं स्पष्ट होत आहे.
दरम्यान, एसटी महामंडळातील रोजंदारीवरील नव्या चालक तथा वाहक असलेल्या १०७ कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे संपात सहभागी झाल्यावरून सेवा समाप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच दुसरीकडे दोन दिवासांत १३ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू संपात सहभागी झालेल्या चालक तथा वाहकांनी २४ तासांच्या आत कर्तव्यावर हजर होण्याची सूचना नोटिसीद्वारे देण्यात आली आहे. रुजू न झाल्यास सेवा समाप्त करण्यात येईल, असा इशारा महामंडळाने दिला आहे. औरंगाबाद विभागात १०७ कर्मचाऱ्यांना अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे गेल्या दोन दिवासांत १३ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ६१ कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले असल्याची माहिती विभाग नियंत्रक विभागाने दिली आहे. दरम्यान, रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा बजावल्या असल्या तरी वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पाठबळामुळे संपात सहभागी राहण्यावर कर्मचारी ठाम राहणार असल्याचे समजते.