नवी दिल्ली : भारताने न्यूझीलंडचा दुसऱ्या टी-२० त पराभव केला. तसेच ३ सामन्यांची मालिका २-० अशा फरकाने खिशात घातली. पहिल्यांदाच रोहित शर्मा भारतीय टी-२० संघाचा पूर्णकालीन कर्णधार आहे. नवीन कोच म्हणून राहुल द्रविडची ही पहिली मालिका आहे. मालिकेतील अखेरचा सामना रविवारी कोलकाता येथे खेळविण्यात येणार आहे.
रोहित-द्रविडच्या जोडीने यामध्ये बाजी मारत पहिला मालिका विजय साजरा केला आहे. भारताने शुक्रवारी लोकेश राहुलच्या ६५ व रोहित शर्माच्या ५५ धावांच्या जोरावर १५४ धावांचे आव्हान पार केले. हर्षल पटेलने भारतासाठी या सामन्यातून त्याचे टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि संघासाठी महत्वाची कामगिरी करत सामनावीर ठरला. त्याने टाकलेल्या चार षटकात २५ धावा दिल्या आणि डेरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स या दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या.
विजयानंतर सामनावीर निवडले गेल्यावर हर्षल पटेल म्हणाला की, “एवढ्या चांगल्या पदार्पणाची अपेक्षा केली नव्हती. जेव्हा तुम्ही प्रोसेसमध्ये असता, तेव्हा फक्त यामध्ये रमून जाता. सुधारणा वेळेसोबत होत असते, खासकरून माझ्या सारख्या लोकांसोबत, ज्यांच्याकडे जास्त गुणवत्ता नाही. मला माझा गेम स्वतः तयार करावा लागतो. मी चुका करतो आणि पुन्हा त्यातून शिकतो की, मी काय केले पाहिजे आणि काय नाही केले पाहिजे.”
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
स्फोटक सुरुवात केलेल्या न्यूझीलंडला २० षटकांत ६ बाद १५३ धावांत रोखल्यानंतर भारताने १७.२ षटकांत ३ बाद १५५ धावा काढत सहज बाजी मारली. राहुलने पहिल्या सामन्यातील अपयश मागे टाकत ४९ चेंडूंत ६५ धावा काढताना ६ चौकार व २ षटकार मारले. कर्णधार रोहितनेही त्याला शानदार साथ देत ३६ चेंडूंत १ चौकार व ५ षटकार ठोकताना ५५ धावा केल्या. दोघांनी ११७ धावांची जबरदस्त सलामी देत भारताचा विजय निश्चित केला.
दोघे बाद झाल्यानंतर ॠषभ पंत (१२*) आणि व्यंकटेश अय्यर (१२*) यांनी भारताचा विजय साकारला. न्यूझीलंडकडून तिन्ही बळी कर्णधार टिम साऊदीने घेतले. त्याआधी, मार्टिन गुप्टिल व डेरिल मिशेल यांनी स्फोटक सुरुवात करून दिल्यानंतरही न्यूझीलंडची वाटचाल मर्यादित धावसंख्येत रोखली गेली. भारतीयांनी पॉवर प्लेनंतर शानदार पुनरागमन करत किवींच्या फटकेबाजीवर अंकुश लावला. आंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने २५ धावांत २ बळी घेतले.
भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
गुप्टिलने डावातील पहिल्या दोन चेंडूंवर चौकार मारत आपले इरादे स्पष्ट करताना भुवनेश्वर व चहर यांच्यावर हल्ला चढवला. त्याने १५ चेंडूंत ३१ धावांचा तडाखा दिला. डेरील मिशेलनेही २८ चेंडूंत ३१ धावा काढल्या. दोघांनी १० च्या धावगतीने फटकेबाजी केली. दोघे बाद झाल्यानंतर किवींची धावगती मंदावली. मात्र, ग्लेन फिलीप्सने २१ चेंडूंत ३४ धावा फटकावत १ चौकार व ३ षटकारांसह संघाच्या धावगतीला वेग देण्याचा प्रयत्न केला.
पॉवर प्लेमध्ये ६४ धावा कुटताना न्यूझीलंडने ८ चौकार व २ षटकार ठोकले. मात्र, यानंतर ७ ते ११ षटकांमध्ये किवींना केवळ एक चौकार मारता आला. आघाडीच्या चार फलंदाजांचा अपवाद वगळता किंवींकडून इतर कोणाला छाप पाडता आली नाही.
न्यूझीलंड : मार्टिन गुप्टिल झे. पंत गो. चहर ३१, डेरील मिशेल झे. सूर्यकुमार गो. हर्षल ३१, मार्क चॅपमन झे. राहुल गो. अक्षर २१, ग्लेन फिलिप्स झे. गायकवाड गो. हर्षल ३४, टिम सीफर्ट झे. भुवनेश्वर गो. अश्विन १३, जेम्स नीशाम झे. पंत गो. भुवनेश्वर ३, मिशेल सँटनर नाबाद ८, ॲडम मिल्ने नाबाद ५. अवांतर – ७. एकूण : २० षटकांत ६ बाद १५३ धावा. बाद क्रम : १-४८, २-७९, ३-९०, ४-१२५, ५-१३७, ६-१४०.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ४-०-३९-१; दीपक चहर ४-०-४२-१; अक्षर पटेल ४-०-२६-१; रविचंद्रन अश्विन ४-०-१९-१; हर्षल पटेल ४-०-२५-२.
Furthermore, foolhardy punters won’t feel comfortable
relaxing and waiting for a great wallet set.
whoah this blog is fantastic i love reading your articles. Keep up the great work! You know, lots of people are looking around for this info, you could help them greatly. I appreciate, cause I found just what I was looking for. You’ve ended my four day long hunt! God Bless you man. Have a great day. Bye
85108 385596Some genuinely intriguing details, properly written and typically user genial . 689581