नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र प्रदान करण्यात आले. दिल्लीत एका समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अभिनंदन यांचा सन्मान करण्यात आला. बालाकोट हवाई हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी (27 फेब्रुवारी 2019) अभिनंदन यांनी पाकिस्तानात घुसून पाकिस्तानी एफ-16 लढाऊ विमान पाडले. नंतर त्यांना पाकने ताब्यात घेतले होते. पण एका दिवसात अभिनंदन यांची सुटका करावी लागली होती.
हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ पुरस्काराने आज, सोमवारी सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वर्धमान यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो अभिनंदन वर्धमान यांना याच महिन्यात प्रमोशन मिळालं आहे. अभिनंदन यांनी बालाकोट एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानला तोडीस तोड प्रत्युत्तर देत पाकचं अमेरिकन बनावटीचं एफ-16 फायटर विमान पाडलं होतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच विंग कमांडर अभिनंदन यांना पदोन्नती देऊन ग्रुप कॅप्टन या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. लष्करातील कर्नल या पदाशी समकक्ष असे ग्रुप कॅप्टन हे हवाई दलातील पद आहे.
एफ-16 जमीनदोस्त केल्यानंतर अभिनंदन यांचं विमानदेखील कोसळलं. त्यानंतर ते पाकिस्तानच्या हद्दीत सापडले. मात्र सुदैवानं त्यांची सुटका झाली आणि ते सुखरुप मायदेशी परतले. फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामात दहशतवादी हल्ला झाला. त्याचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत जात होते. त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरीस भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले केले. त्यात दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले.
संतापलेल्या पाकिस्तानी हवाई दलानं भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला. मात्र भारतीय हवाई दलानं त्यांना पिटाळून लावलं. याच दरम्यान विंग कमांडर अभिनंदन (आता ग्रुप कॅप्टन पदावर कार्यरत) पाकिस्तानचं एफ-16 विमान जमीनदोस्त केलं. त्यानंतर त्यांचंही विमान कोसळलं. ते पाकव्याप्त काश्मीरमधील काही स्थानिकांच्या तावडीत सापडले. सुदैवानं त्यांची काही तासांमध्ये सुटका झाली.