Thursday, May 26, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

आमिर खानचं तिसरं लग्न होणार का ? अमिर खाननेच दिले उत्तर

Surajya Digital by Surajya Digital
November 23, 2021
in Hot News, टॉलीवुड
5
आमिर खानचं तिसरं लग्न होणार का ? अमिर खाननेच दिले उत्तर
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : अभिनेता आमिर खानने काही महिन्यांपूर्वीच किरण रावशी घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आमिर अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत रिलेशनशीपमध्ये असून तिसरं लग्न करणार, अशी चर्चा होती.

या चर्चेविषयी लवकरच घोषणा होणार, असेही वृत्त सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून आमिर खान हा चित्रपटांसह त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आमिर हा लवकरच तिसरं लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आमिर हा अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. लवकरच हे दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे.

मात्र या सर्व अफवा असून यासंबंधीची बातमी चुकीची आहे, तिसऱ्या लग्नाचा कोणताही विचार नाही, असा खुलासा आमिरकडून करण्यात आला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

विशेष म्हणजे अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत तो लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे. फातिमाने आमिरसोबत ‘दंगल’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटात काम केले आहे. किरण रावसोबत घटस्फोट घेतल्यानतंर आमिर हा फातिमासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होती. यावरुन आमिरला अनेकांनी ट्रोल केले होते.

आमिरने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमिरच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, “आमिर खान तिसरं लग्न करणार असल्याची बातमी पूर्णत: चुकीची आणि खोटी आहे. आमिर तिसरे लग्न करण्याच्या कोणत्याही विचारात नाही. त्यामुळे मीडियामध्ये त्यांच्याबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत, त्या पूर्णपणे निराधार आहेत,” असे स्पष्टीकरण दिले आहे.

आमिर खानने आतापर्यंत दोन लग्न केले आहेत. 1987 मध्ये अभिनेत्याने रीना दत्तासोबत पहिलं लग्न केलं. 2002 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर आमिर खानने किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. पण दोघांचे नातेही फार काळ टिकले नाही. आमिर खानला इरा खान, जुनैद खान आणि आझाद राव खान अशी तीन मुले आहेत.

Tags: #AamirKhan #married #thirdtime #answer#आमिरखान #तिसरंलग्न #होणार #उत्तर
Previous Post

वडवळजवळ भीषण अपघात; वृद्ध पती-पत्नी ठार; ट्रकची ट्रॅव्हल्स बसला धडक 

Next Post

भररस्त्यात कोयत्याचे सपासप वार करुन बायकोचा खून, पती फरार

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
भररस्त्यात कोयत्याचे सपासप वार करुन बायकोचा खून, पती फरार

भररस्त्यात कोयत्याचे सपासप वार करुन बायकोचा खून, पती फरार

Comments 5

  1. the best lint remover says:
    4 months ago

    Thanks for the input. I’ll be back to read more later.

  2. gralion torile says:
    3 months ago

    I loved as much as you will receive carried out right here. The sketch is attractive, your authored subject matter stylish. nonetheless, you command get got an edginess over that you wish be delivering the following. unwell unquestionably come more formerly again as exactly the same nearly very often inside case you shield this hike.

  3. dynamic qr codes says:
    3 months ago

    I really appreciate your piece of work, Great post.

  4. belföldi fuvarozás Europa-Road Kft. says:
    3 months ago

    Thanks for another informative website. Where else could I get that kind of info written in such a perfect way? I have a project that I am just now working on, and I have been on the look out for such information.

  5. zomenoferidov says:
    2 months ago

    I always was interested in this topic and still am, regards for posting.

वार्ता संग्रह

November 2021
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Oct   Dec »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697