मुंबई : चर्चेत राहणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीचे लग्न सेव्हन स्टार दर्जाच्या हॉटेल मध्ये होत आहे. या लग्नाच्या लग्न पत्रिकेची जोरदार चर्चा होत आहे. यात पूर्वशी आणि मल्हार यांच्या पूर्वशी (Purvashi) या नावातील पी (P) तसेच मल्हार (Mahlar) या नावातील एम (M) या अक्षरांना घेऊन एक खास हॅशटॅग तयार करण्यात आला. या दोन्ही नावांच्या आद्यक्षरांना घेऊन लग्नपत्रिकेवर #PMkiShaadi असं छापण्यात आले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी हिचा विवाह ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी होणार आहे. दरम्यान, लग्नापूर्वी एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक नेत्यांनीही उपस्थिती लावली.
या लग्नसोहळ्यात राज्यातील बड्या हस्ती तसेच मोठे राजकारणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 29 नोव्हेंबर रोजी हा लग्नसोहळा पार पडणार आहे. सध्या पूर्वशी-मल्हार यांचा हळदी समारंभ, संगीत कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर आले आहेत. पण सध्या मात्र राऊत यांच्या कन्येची लग्नपत्रिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पत्रिकेवरील #PMkiShaadi (पीएम की शादी) हा हॅशटॅग सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
या लग्न पत्रिकेमध्ये पूर्वशी आणि मल्हार यांचे इंग्रजीत नाव आहे. पूर्वशी (Purvashi) या इंग्रीजी नावातील पी (P) तसेच मल्हार (Mahlar) या नावातील एम (M) या अक्षरांना घेऊन एक खास हॅशटॅग तयार करण्यात आलाय. या दोन्ही नावांच्या आद्यक्षरांना घेऊन लग्नपत्रिकेवर #PMkiShaadi असं छापण्यात आलंय. हा हॅशटॅग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पूर्वशी राऊत यांचे पिता संजय राऊत यांच्यासह दोन्ही काकाही भावूक झाल्याचं दिसलं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
* व्हिडिओ- संजय राऊत अन् सुप्रिया सुळेंचा भन्नाट डान्स
विवाह निमित्त नुकताच संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राऊत आणि सुळे यांनी भन्नाट डान्स केला.
महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावरून आज भाजपकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत सध्या आपल्या लेकीच्या लग्नाच्य तयारीत व्यस्त आहे.
संजय राऊत यांच्या मुलीचा पूर्वशीचा विवाह संपन्न होणार आहे, यानिमित्त झालेल्या संगीत कार्यक्रमात सांज राऊत यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत भन्नाट डान्स केला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी हिचा विवाह ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी होणार आहे. दरम्यान, लग्नापूर्वी एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक नेत्यांनीही उपस्थिती लावली.
व्हिडिओ- संजय राऊत अन् सुप्रिया सुळेंचा भन्नाट डान्स
शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या विवाहबंधनात अडकणार आहे.https://t.co/jv07BGwb1s— Surajya Digital (@SurajyaDigital) November 28, 2021
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही सहकुटूंब या कार्यक्रमास हजेरी लावली होती. यावेळी सुळे यांनी केलेल्या आग्रहास्तव संजय राऊत यांनी ठेका धरत डान्स केला. यावेळी त्यांच्या पत्नी वर्षा राऊत देखील उपस्थित होत्या. संगीत कार्यक्रमात राऊत व सुळे यांनी केलेल्या डान्सची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर केली जात आहे.
संजय राऊत यांनी मुलीच्या विवाहाचं निमंत्रण राज्यातील अनेक दिग्गज नेते मंडळींना दिले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेऊन संजय राऊत यांनी विवाहाचं निमंत्रण दिलं होतं. तसेच आजच्या संगीत समारंभात शास्त्रीय संगीत गायक राहुल देशपांडे यांनी काही गाणी गायली.
मुलगी सासरी जाणार असल्याने संजय राऊत यांच्या डोळ्यात अश्रू तरळताना दिसले. दरम्यान, राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेले संजय राऊत सध्या मुलीचे लाड पुरवण्यात व्यस्त आहेत. मुलगी पूर्वशीला आनंदाने मिठीत घेताना दिसत आहेत. पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत.
Excellent! I thank you your input to this matter. It has been insightful. my blog: master cleanse
Utterly pent articles, thankyou for entropy.
I like the valuable info you provide to your articles. I will bookmark your weblog and test once more here frequently. I am quite sure I will be informed lots of new stuff proper here! Best of luck for the next!
Heya are using WordPress for your blog platform? I’m new to the blog world but I’m trying to get started and create my own. Do you require any coding knowledge to make your own blog? Any help would be greatly appreciated!