लातूर : शहरामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लातूर शहरामध्ये कोरोना लशी बॉक्ससह रस्त्यावर बेवारसपणे आढळून आल्याची धक्कादायक घडना घडली आहे. मुख्य रस्त्यांवर देखील ठिकठिकाणी व्हॅक्सिन घेण्याची सोय लातूर महानगर पालिकेने केली आहे. मात्र, लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अजबच प्रकार केल्याचं समोर आला आहे.
लातूरमध्ये बेवारस कोव्हीशिल्ड व्हॅक्सिन सापडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेवर लातूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा झोपली का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. लातूर शहरात घरोघरी जाऊन लोकांना व्हॅक्सिन देण्याची मोहीम सध्या मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. तसेच मुख्य रस्त्यांवर देखील ठिकठिकाणी व्हॅक्सिन घेण्याची सोय लातूर महानगरपालिकेनं केलीय.
मात्र व्हॅक्सिनेशन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अजबच प्रकार केल्याची घटना समोर आली आहे. व्हॅक्सिन ठेवण्यासाठीचा आईस बॉक्स व त्यात बारा ते पंधरा कोव्हीशील्ड व्हॅक्सिनच्या बॉटल्स, इंजेक्शन व इतर साहित्य गेल्या दोन दिवसांपासून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका मॉलसमोर ठेऊन कर्मचारी निघून गेल्याची घटना घडली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बेवारसपणे पडून असलेलं हे साहित्य कांही तरुणांच्या निदर्शनास आल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलाय.
एकीकडे व्हॅक्सिनची कमतरता असताना अशाप्रकारे व्हॅक्सिन टाकून देणं गंभीर आहे. तसेच ॲमिक्रॉन व्हेरिएंट या कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग वाढत असताना लसीकरणासारख्या गोष्टींना गांभिर्याने घेण्याची गरज असताना हा प्रकार आरोग्य कर्मचाऱ्यांकडून होणे फारच निंदनीय आहे. हि बाब गंभीर असल्यानं मनपा आयुक्तांनी याची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
लातूर शहरात व्हॅक्सिनचा साठा आणि बॉक्स बेवारसपणे आढळून आल्याने खळबळ माजली आहे. हा बॉक्स लातूर येथील शॉपर्स स्टॉप दुकानाच्या पायऱ्यावर वॉचमनला मंगळवारी (ता.३०) रात्री आढळून आला आहे. या वॉचमनने याची माहिती लोकांना दिली. घटनास्थळी येऊन काही जणांनी पाहणी केली असता कोव्हिशिल्ड लसीच्या बॉटल आणि त्या ठेवण्यासाठी वापरले जाणारे आईस बॉक्स बेवारस आढळून आले. हा प्रकार पाहून अनेकजण संतप्त झाले. संबंधित व्यक्तीविरुद्ध मनपा आयुक्त यांनी कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
generic doxycycline
Hi there, I recently found your web web site by way of bing. Your own post is actually pertinent to be able to my entire life at present, and also Ia’m really happy I discovered your internet site.
864365 60199This will likely be a terrific internet website, will you be involved in performing an interview regarding how you developed it? If so e-mail me! 487043