नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनची लागण भारतातल्या दोन रुग्णांना झाली आहे.
दोन्ही रुग्ण कर्नाटकातील आहेत. केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोनाचा चिंताजनक व्हेरिएंट असल्याचे आधीच घोषित केले आहे. आतापर्यंत जवळपास 29 देशांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ओमिक्रॉनचा शिरकाव रोखण्यासाठी सरकारकडून बरेच प्रयत्न सुरु होते. पण आता हे सगळे प्रयत्न तोकडे ठरले आहेत. कारण ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेले दोन कोरोनाबाधित रुग्ण आता भारतात सापडले आहेत. हे दोन्ही रुग्ण कर्नाटकमधील असल्याचं वृत्त आहे. हे परदेशातून आलेले 66 आणि 46 वर्षीय दोन पुरूष आहेत. सध्या हा व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याने जगभरात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
खुद्द भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या हवाल्याने म्हटले आहे की, कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षा 5 पट जास्त धोकादायक आहे आणि इतर व्हेरिएंटपेक्षा तो अधिक वेगाने लोकांना संक्रमित करु शकतो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पण भारतात चिंता करण्याची गरज नाही नागरिकांनी खबरदारीची पुरेपूर काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.
ओमिक्रॉन आढळल्याबद्दल घाबरून जाण्याची गरज नाही. पण जागरुकता अत्यंत आवश्यक आहे.कोविड टाळण्यासाठीच्या योग्य वर्तनाचे अनुसरण करा, मेळावे टाळा.’ असं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले.
दोन्ही प्रकरणे कर्नाटकमध्ये नोंदवली गेली आहेत ज्यात रूग्ण ६६ आणि ४६ वयोगटातील दोन परदेशी आहेत, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी त्यांची ओळख आता उघड केली जाणार नाही.
या दोघांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचा शोध घेण्यात आला आहे आणि त्यांची चाचणी केली जात आहे, ते म्हणाले की, दोन्ही प्रकरणे सौम्य आहेत आणि अद्याप कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत.
सुरुवातीच्या संकेतांनी असे सुचवले आहे की मोठ्याप्रमाणावर उत्परिवर्तित झालेला ओमिक्रॉन मागील प्रकारांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त संसर्गजन्य असू शकतो, तथापि, हा प्रकार जास्त घातक असल्याचा कोणताही पुरावा नाही.
* Omicron व्हेरिएंटचा पहिला फोटो
– दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळला आहे. त्याला ओमिक्रॉन असं नाव देण्यात आलंय. त्यातच आता या व्हेरियंटचा पहिला फोटो समोर आला आहे. अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये जास्त म्युटेशन असल्याचं समोर आलंय. इटलीची राजधानी रोममधील बम्बिनो गेसु रुग्णालयाने ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फोटो प्रकाशित केला आहे.