मुंबई : अंतराळात घडणाऱ्या घटना आजही सामान्य माणसांसाठी असामान्य असतात. उल्कावर्षाव होण्याच्या कालावधीत एखादा तारा तुटताना दिसला की डोळे बंद करून मागितलेली इच्छा पूर्ण होते, अशी गोड मान्यता आहे. या वर्षीचा शेवटचा महिना सुरु झाला आहे. या महिन्यात नयनरम्य उल्कावर्षाव पाहण्याची संधी अंतराळप्रेमींना मिळणार आहे. हा जेमिनिड उल्कावर्षाव असेल. जो १३ डिसेंबरच्या रात्रीपासून १४ डिसेंबरच्या सकाळपर्यंत अनुभवता येईल.
अंतराळात सातत्याने घडणाऱ्या घडामाेडींचा अंत नाही. चांगले आणि वाईट अनुभव देणारे २०२१ हे वर्ष आता शेवटाच्या टप्प्यात आले असून या महिन्यात नयनरम्य उल्कावर्षाव पाहण्याची संधी अंतराळप्रेमींना मिळणार आहे.
हा जेमिनीड उल्कावर्षाव असेल जाे १३ डिसेंबरच्या रात्रीपासून १४ डिसेंबरच्या सकाळपर्यंत अनुभवता येईल. रमन विज्ञान केंद्राचे खगाेलशास्त्राचे शिक्षक महेंद्र वाघ यांनी जेमिनीड उल्कावर्षावाची माहिती दिली. जेमिनीड हा उल्कावर्षावाचा राजा मानला जातो व अशा प्रकारचा वर्षाव केवळ स्वर्गात मिळताे अशी कल्पना केली जाते.
हा सर्वाधिक तेजस्वी उल्कावर्षाव असून १९८२ साली शाेधलेल्या ‘३२०० फिथाॅन’ या लघुग्रहाने मागे साेडलेल्या ढिगाऱ्यातून निर्माण हाेताे. दरवर्षी ७ ते १७ डिसेंबरच्या काळात त्यांचा वर्षाव हाेताे. यामध्ये १२० रंगाच्या बहुरंगी उल्कांचा दर तासाला वर्षाव हाेत असताे आणि १३ डिसेंबरच्या रात्री हा उत्कृष्ट काळ राहणार आहे. उल्का चंद्राआडून दिसत नाही पण जेमिनीड हे तेजस्वी असल्याने सहज पाहता येतील. मध्यरात्रीला अंधारलेल्या ठिकाणाहून उत्तर-पूर्व आकाशातून जेमिनीड तारकासमूहातून हा वर्षाव निघताना दिसेल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, अनेक महत्त्वपूर्ण घडामाेडी अंतराळात घडणार आहेत. ४ डिसेंबरला चंद्र हा पृथ्वी व सूर्याच्या एकाच बाजूला असेल व त्यामुळे रात्रीच्या आकाशात ताे दिसणार नाही. रात्री ७.४४ वाजता हा टप्पा असेल. आकाशगंगा आणि तारा समूह यांसारख्या अस्पष्ट वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी हा महिन्याचा सर्वोत्तम काळ आहे, कारण चंद्रप्रकाश राहणार नाही.
दरम्यान ४ डिसेंबरला चंद्र सूर्याला पूर्णपणे अवराेधित करणार असल्याने संपूर्ण सूर्यग्रहण हाेईल. मात्र ग्रहणाचा संपूर्ण मार्ग अंटार्क्टिका आणि दक्षिण अटलांटिक महासागरापर्यंत मर्यादित असेल. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत आंशिक ग्रहण दिसेल. २१ डिसेंबरला पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याकडे झुकलेला असेल, जो आकाशात त्याच्या दक्षिणेकडील स्थानावर पोहोचला असेल. याला खगाेलीय भाषेत डिसेंबर संक्रांती, असेही म्हणतात.
हा उत्तर गाेलार्धात हिवाळ्याचा पहिला दिवस आणि दक्षिण गाेलार्धात उन्हाळ्याचा पहिला दिवस असेल. २१ आणि २२ डिसेंबरलासुद्धा अरसिड उल्कावर्षाव हाेईल. हा किरकाेळ उल्कावर्षाव मानला जाताे जाे धूमकेतूने मागे साेडलेल्या धुलिकणांमुळे निर्माण हाेताे. हा धूमकेतू १७९० मध्ये शाेधण्यात आला हाेता.