नाशिक : ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. नाशिकमध्ये सुरु असलेल्या साहित्य संमेलनस्थळी हा प्रकार घडला. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. आज रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आल्याचा आरोप असला तरी संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल लिहिलेल्या पुस्तकावर आक्षेप घेत शाईफेक करण्यात आली. आज रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. संभाजी ब्रिगेड या संघटनेने याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली असून या प्रकरणात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला जमा होत त्यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केल्याचेही सांगण्यात येत आहे.
सतीश काळे आणि राजेश गुंड यांच्या पाठीशी संपूर्ण संभाजी ब्रिगेड आणि शिवप्रेमी ठामपणे उभे असल्याचे संभाजी ब्रिगेडचे सोलापूर शहराध्यक्ष शाम कदम यांनी सांगितलंय. #surajyadigital#सुराज्यडिजिटल #पुणे #सोलापूर #संभाजीब्रिगेड pic.twitter.com/WrBcmiTShj
— Surajya Digital (@SurajyaDigital) December 5, 2021
गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले. दरम्यान, गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
गिरीश कुबेर हे आज साहित्य संमेलनात एका परिसंवादात सहभागी होणार होते. या परिसंवादात सहभागी होण्याआधीच त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या घटनेमुळे साहित्य संमेलनात मोठी खळबळ उडाली.
गिरीश कुबेर यांच्यावर संमेलन स्थळी शाही फेक… करण्यात आली संभाजी महाराजांवर वादग्रस्त असले पुस्तक आणि त्यांच्यावर करण्यात येणारी टिप्पणी या निषेधार्थ संभाजी ब्रिगेटच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकण्यात आली@girishkuber @sahityaakademi @ChhaganCBhujbal @HindusthanPostH pic.twitter.com/zSXJH01w39
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) December 5, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सकाळीच साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भेट दिली होती. त्यांनी संमेलन परिसरात फेरफटका मारत साहित्यिकांशी देखील संवाद साधला होता.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी पवारांचं स्वागत केलं होतं. मात्र, संभाजी ब्रिगेडने केलेल्या या कृत्यामुळे गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावरून सुरू असलेला वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, गिरीश कुबेर यांच्यावर केलेल्या या शाईफेकीनंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावरून वाद सुरू होता. या पुस्तकातील मजकूराबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी करण्यात आला असल्याचा आरोप याआधीच संभाजी ब्रिगेडने केला होता. या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर याआधी नाराजी व्यक्त केली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवा यांची तुलना करून काय साध्य करायचं होतं असा प्रश्न आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला होता. पुस्तकाची शहानिशा व्हावी अशीही त्यांनी मागणी केली होती. तर, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या पुस्तकातील वादग्रस्त मजकूर वगळण्याचीही मागणी केली होती.