मोहोळ : पेनूर तालुका मोहोळ येथे शेतामध्ये गांजाची लागवड केलेली ८४ रोपे व सहा किलो वाळलेला गांजा असा १७ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा गांजा मोहोळ पोलिसांनी जप्त केला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना पेनूर हद्दीमध्ये गांजाची लागवड केली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी याची खात्री केली. या ठिकाणी परिसरामध्ये शेतामध्ये जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता वैजनाथ जाधव यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये चोरून गांजाची रोपे लागण्याची लागवड केली असल्याचे निदर्शनास आले.
या ठिकाणी एकूण ८४ झाडे व अर्धवट वाळलेला सहा किलो गांजा असा एकूण १७ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला. याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद ढावरे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूनगे, ए एस आय लोबो चव्हाण, युसुफ शेख, समाधान पाटील , पोलीस कॉन्स्टेबल निलेश देशमुख, गणेश दळवी, पांडुरंग जगताप, हरीश थोरात, वसीम शेख यांनी केली. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूनगे हे करीत आहेत
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* चारित्र्यावर संशयावरून पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
मोहोळ : चारित्र्यावर संशय घेत पतिने पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. यात महिला गंभीर जरवमी होवून बेशुद्ध पडली. ही घटना शनिवारी (ता. ४) दुपारी ताबोळे (ता. मोहोळ ) येथे घडली. विवाहित महिलेने शुद्धीवर आल्यावर मोहोळ पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला.
तानाजी गोरखनाथ लोखंडे (वय 32 रा. तांबोळे ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेली माहिती, अशी की तांबोळे तालुका मोहोळ येथील विवाहित महिला आपल्या भावाच्या लग्नात गेली होती. ती लग्नानंतर परत आल्यावर पती-पत्नी दोघेही झोपलेले असताना अचानक पती जागा झाला आणि त्याने बायकोला हाताला धरून घराबाहेर ओढत आणले आणि तुझ्या भावाच्या लग्नाला का गेली होती, अशी दमबाजी करीत विचारणा केली. तुझ्या भावाच्या लग्नात आम्हास मानपान योग्य तो केला नाही, त्याचबरोबर तू चांगल्या पद्धतीने वागत नाहीस, कोणाचीतरी सतत फोनवर बोलत असतेस, असे म्हणत तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
तिचे यापूर्वी दोन वेळा सिजर झाले असून त्यामुळे तिच्या पोटात सतत दुखते हे पतीला माहित असूनदेखील पोटामध्ये देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. लोखंडी रॉडने हातावर आणि डोक्यात मारहाण केली. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर तिने मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये पती तानाजी लोखंडे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. याचा पुढील तपास मोहोळ पोलिस करत आहेत.