सोलापूर : सुर्या ग्रुपच्या वतीने गेल्या 10 वर्षापासून सुरू असलेल्या सुर्या कार्पोरेट क्रिकेट ट्रॉफी यंदा 11 डिसेंबरपासून सोलापूरमध्ये सुरू होत असून या स्पर्धेच्या चषकाचे अनावरण महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. मिलिंद थोबडे यांच्या हस्ते सुर्या हॉटेल येथे करण्यात आले.
यावेळी सुर्या ग्रुपचे अध्यक्ष राजकुमार सुरवसे, श्रीकांत कलशेट्टी, राहूल खमितकर, मनोज भागवत आदी उपस्थित होते. दर शनिवार आणि रविवारी ही स्पर्धा वल्याळ पटांगण कर्णिक नगर येथे होणार आहे.
या स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्हा न्यायालय, जिल्हा प्रशासकीय कार्यालय संघ, सोलापूर महानगर पालिका संघ, भारतीय स्टेट बॅक संघ, आयसीआयसीआय बँक संघ अशा एकूण 24 क्रिकेट संघानी सहभाग घेतला आहे.
11 डिसेंबरपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेचे यंदाचे 10 वे वर्ष असून मोठ्याप्रमाणात बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पहिले बक्षिस सन्मित्र डेव्हलपर्स यांच्याकडून 25 हजार रूपये आणि चषक, द्वितीय बक्षिस निर्मल डेव्हलपर्स यांच्याकडून 11 हजार रूपये आणि चषक तसेच गंगा मल्टिअॅ्नटीव्हीटी सेंटर, अक्षरवाल पॅलेस, अन्नपुर्णा स्विट, राहूल खमितकर यांच्याकडूनही विविध बक्षिसे ठेवण्यात आले आहेत.
सुर्या कार्पोरेट ट्रॉफी 2021 चे चषक मोठ्या आकाराचे आणि आकर्षक करण्यात आले आहे. त्याचे अनावरण ॲड. मिलिंद थोबडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी ही स्पर्धा गेल्या 10 वर्षापासून अविरतपणे सुरू आहे. सोलापूरच्या क्रिकेट क्षेत्रात अत्यंत नावाजलेली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयराज मडिवाळ, मनिष काळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय सुरवसे, विजय कोनापुरे, आप्पा रामदासी, दत्ता शिंदे, ज्ञानेश्वर लिंबोळे, दिपक भोसले, अविनाश बोदले, काशिनाथ औरसंग, स्वरूप स्वामी आदींनी परिश्रम घेतले.