मुंबई : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ईडीच्या कार्यालयात हजर झाली आहे. सुकेश चंद्रशेखर याच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात ईडीने जॅकलीनला समन्स बजावले होते. याप्रकरणी जॅकलीनची चौकशी केली जात आहे. दरम्यान, याआधी ईडीने जारी केलेल्या लूक आऊट नोटीसमुळे तिला भारताबाहेर कोठेही न जाण्याची ताकीद देण्यात आली होती.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. ईडीने जॅकलीनला मुंबई एअरपोर्टवर थांबवलं. लूक आऊट सर्क्युलरमुळे अभिनेत्रीला थांबवल्याचं बोललं जात आहे. मुंबईहून दुबईला जात असताना जॅकलिनला विमानतळावर थांबवण्यात आलं. दरम्यान, सुकेश चंद्रशेकर 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलीनची दोनदा चौकशी करण्यात आली आहे. हे प्रकरण सुरू आहे तोपर्यंत ती परदेशात जाऊ शकत नाही, असं ईडीने सांगितलं.
सुकेशकडून महागडी जनावरं गिफ्ट घेणं महागात पडले आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनचे नाव समोर आले आहे. मुंबई विमानतळावर ईडीने तिला थांबवले होते. त्यानंतर आता 8 डिसेंबर रोजी दिल्लीत हजर राहण्याचे ईडीने तिला समन्स बजावले होते. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी झाली असल्याची माहिती आहे.
Actor Jacqueline Fernandez appears before Enforcement Directorate (ED) at its office in Delhi in connection with Rs 200 crore extortion case involving conman Sukesh Chandrasekhar pic.twitter.com/LNd6v5qs2y
— ANI (@ANI) December 8, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जॅकलीन एका कार्यक्रमासाठी दुबईला जात असताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी 5 तारखेला मुंबई विमानतळावर तिला थांबवले होते. सुकेश चंद्रशेखर यांच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी सुरु आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनचे नाव समोर आले आहे. मुंबई विमानतळावर ईडीने तिला थांबवले होते. त्यानंतर आता 8 डिसेंबर रोजी दिल्लीत हजर राहण्याचे ईडीने तिला समन्स बजावले होते. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी झाली असल्याची माहिती आहे.
सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीने एकूण 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलं होतं. तल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे. जॅकलीन आणि सुकेशचा एक फोटोदेखील समोर आला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर जॅकलीन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. दिल्लीच्या तिहार तुरुंगातून 200 कोटी रुपये वसूल केल्याप्रकरणी ईडीने शनिवारीच आरोपपत्र दाखल केले होते.
* 52 लाखांचा घोडा आणि 9 लाखांची मांजर, सुकेश चंद्रशेखरचे जॅकलिनला गिफ्ट
मनी लॉन्ड्रींग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी लीना मारियासह इतर 6 जणांविरुद्ध ईडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. सुकेशने अभिनेत्री जॅकलिनला 52 लाख रुपये किंमतीचा घोडा आणि 9 लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. दरम्यान, ईडीने जॅकलिनसोबतच या आरोपपत्रात अभिनेत्री नोरा फतेहीचाही उल्लेख केला आहे. या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने यापूर्वीच दोन्ही अभिनेत्रींची चौकशी केली आहे.