जयपूर : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. राजस्थानमधील माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये मोठ्या राजेशाही थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. या जोडप्याने त्यांच्या लग्नाची तयारी अगदी गुप्त ठेवली होती. मात्र कशामुळे इतकी गुप्तता हेच आणखी समजू शकले नाही.
या लग्नसोहळ्यामध्ये कतरिनाने डार्क गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर विकीने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी घातली होती. दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसोबत मेहंदी आणि संगीत समारंभ पार पडला. हा सोहळा आणखी खास बनवण्यासाठी नेहा कक्कर, हार्डी संधू, रोहनप्रीत ते आरडीबी सारखे स्टार्स देखील या उपस्थित होते.
विकी आणि कतरीनाचं लग्न हिंदू विवाह पद्धतीने झाले आहे. त्याचे काही सुंदर फोटोही समोर आले आहेत. लग्नाच्या आधी विकीने एका खास विंटेज कारमधून एन्ट्री केली.
राजस्थानमधील सवाई माधोपूरच्या चौथ का बरवडामध्ये या जोडप्याने एकमेकांना पती-पत्नी म्हणून स्वीकारले आहे. अभिनेत्री कतरिना विकी कौशल यांच्या लग्नाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आता तो क्षण आला आहे जेव्हा कतरिनाचा ब्राइडल लुक सर्वांसमोर आला आहे. कतरिनाने तिच्या इन्स्टावर काही फोटो शेअर केले आहेत. दोघ देखील खुप सुंदर आणि आनंदात दिसत आहेत.
वधू-वर बनलेल्या कतरिना-विकीचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. ऑफ व्हाइट शेरवानीमध्ये विकी हॅण्डसम दिसत होता. या जोडीची पहिली झलक पाहायला मिळाल्याने चाहते खूपच खूश आहेत.
लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणाबाहेरील फोटो समोर आले आहेत. विकी आणि कतरिनाने प्रायव्हसीची विशेष काळजी घेतली आहे. त्यासाठी त्याने पाहुण्यांना आपला फोन हॉटेलच्या खोलीत ठेवण्यास आणि फोटो शेअर न करण्यास सांगितले आहे. मात्र, आता लग्नाच्या ठिकाणाचे फोटो व्हायरल होत आहेत. ज्यात सुरक्षा कर्मचारी बॅरिकेड्स लावून बाहेर उभे आहेत आणि गेटच्या बाहेर दोन रुग्णवाहिकाही उभ्या असलेल्या दिसत आहेत.
विकी आणि कतरीना उद्या मुंबई विमानतळावरून थेट मालदीवला हनीमूनला रवाना होणार आहेत. उद्या दुपारी ते साडेबाराच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल होतील, मात्र विमानतळाच्या बाहेर न पडता ते थेट मालदीवसाठी निघणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या लग्नाची जोरदार चर्चा होती. विकी आणि कतरीना यांच्या लग्नानाला त्यांचा परिवार आणि काही मोजक्याच लोकांची उपस्थिती होती. लग्नात काही खास नियमावलीही लावण्यात आली होती.