मुंबई : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचे 7 नवीन रुग्ण आज महाराष्ट्रात आढळले आहेत. यातील 3 रुग्ण हे मुंबईतील आहेत. तर 4 रुग्ण पिंपरी-चिंचवडमधील आहेत. यामुळे महाराष्ट्रात ओमिक्रॉनची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 17 वर पोहोचली आहे.
ओमिक्रॉन आतापर्यंत 59 देशांमध्ये आढळला आहे. दरम्यान मास्क वापरणे आणि तातडीने कोरोनावरील लस घेण्याचे आवाहन आज केंद्र सरकारने केले आहे.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज नव्या सात ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईतील तीन तर पिंपरी चिंचवडमधील चार रुग्णांचा समावेश आहे. मुंबईत आढळलेले तीन रुग्ण हे 48, 25 आणि 37 वर्षांचे आहेत. हे रुग्णांनी टांझानिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या देशातून प्रवास केला आहे.
राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. सध्या 75 हजार 290 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 870 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 66 लाख 39 हजार 988 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबईमध्ये ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 5 वर पोहोचली आहे. याआधी मुंबईत दोन रुग्ण आढळले होते. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या ही 17 वर पोहचली आहे. राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 17 रुग्ण आहेत. मुंबईमध्ये 3 रुग्ण आढळले आहेत तर पिंपरी चिंचवडमध्ये 4 रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईतील तिन्ही रुग्ण हे परदेशातून आलेले आहेत. या 7 रुग्णांपैकी चार जाणांनी कोरोनाची लस घेतलेली होती. तर एका व्यक्तीने एकच डोस घेतला होता. धक्कादायक म्हणजे या सात जणांमध्ये 3.5 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.
मुंबईची सर्वात गजबजलेली झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आला आहे. परदेशातून आलेल्या एका मौलवीचा ओमायक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मुंबईतील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून उपाययोजना करीत आहेत.
लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात देशातील पॉझिटिव्हटी रेट 0.73 टक्के आहे. केरळ आणि महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असून केरळमध्ये सर्वाधिक 43 टक्के सक्रिय रूग्ण आहेत, तर महाराष्ट्रात ही संख्या 10 टक्के आहे.