मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोण यांचा ’83’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चित्रपटावर दुबईमधील एक व्यक्तीने कट रचून फसवणूक केल्याचा आरोप केलाय. मुंबईतील प्रथम न्यायदंडाधिकारी कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये 83 चित्रपटाचे सर्व निर्माते आणि दीपिका पादुकोणवर फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संयुक्त अरब अमिरातीस्थित एका फायनान्स कंपनीने या चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये विब्री मीडिया आणि त्याच्या संचालकांची नावे आहेत. या चित्रपटात दिग्दर्शक कबीर खान यांनी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेल्या पहिल्या-वहिल्या क्रिकेट वर्ल्डकपची रंजक कहाणी आहे.
भारतीय संघाने अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत करून 1983 मध्ये पहिली विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती. रणवीर सिंह कपिल देवच्या भूमिकेत चपखल बसत आहे. यात कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांची भूमिका दीपिका पादुकोण साकारत आहे.
अभिनेत्री दीपिका पादुकोनसह सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात फसवणूकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सिनेमावर UAE स्थित फायनान्सरने सिनेमाच्या निर्मात्यांनी कट रचून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात मुंबईतील न्यायदंडाधिकारी कोर्टात भारतीय दंडसंहितेच्या कलम 405, 406,415, 418, 420 आणि 120 ब अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दीपिका पादुकोन,साजिद नाडीयावाला आणि कबीर खान या तिघांनी 83 या सिनेमाची निर्मिती केली आहे. त्यामुळे या तिघांविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.दीपिका पादुकोनची निर्मिती म्हणून हा पहिला सिनेमा आहे. मात्र सिनेमा रिलीजच्या आधीच वादात सापडला आहे.
निर्मात्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, विब्री मीडिया सोबत सिनेमाच्या इव्हेस्टमेंटविषयी हैद्राबादमध्ये चर्चा होती. युएईमधील एका कंपनीने विब्री मीडियासोबत तब्बल 16 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणूकीच्या मोबदल्यात चांगले रिटर्न्स दिले जातील असे सांगण्यात आले होते. यातील संपूर्ण पैसा हा 83 सिनेमासाठी खर्च करण्यात आला असे तक्रारीत म्हटले असल्याची माहिती वकील रिजवान सिद्धीकी यांनी दिली आहे.
वकील रिजवान सिद्धीकी यांनी पुढे म्हटले, माझ्या अशीलाकडे तक्रार दाखल करण्यापलिकडे कोणताच पर्याय नव्हता. त्यांनी अनेकदा हा प्रश्न आपापसात सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र कोणत्याच निर्मात्यानी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची तसदी घेतली नाही. सिनेमाच्या निर्मात्यांवर करण्यात आलेल्या आरोपांचा सिनेमावर परिणाम होणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.