मुंबई / जालना : मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवांच्या वारसांना नोकरी देण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. तसेच यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मराठा आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून प्रत्येकी दहा लाख रूपयांची मदत देण्यात येत आहे. याचे वाटप राजेश टोपे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
मराठा आंदोलनात बलीदान दिलेल्या समाजबांधवांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्यात येणार असल्याची घोषणा आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी बलीदान दिलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रूपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती. यानंतर आज राजेश टापे यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना नोकरी देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अनेक तरुणांनी बलिदान दिलं होतं. त्यांच्या वारसांना नोकरी देखील मिळणं गरजेचं असल्याचं राजेश टोपे म्हणाले. वारसांना फक्त महामंडळात नोकरी न देता गुणवत्तेच्या आधारावर योग्य नोकरी देण्यात यावी, असं राजेश टोपे म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मराठा आरक्षणात बलीदान दिलेल्या ३४ जणांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ६, जालना ३, बीड ११, उस्मानाबाद २, नांदेड २, लातूर ४, पुणे ३, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आता त्यांच्या वारसांना शासकीय नोकरी मिळणार आहे.
“सतत पाठपुरावा केल्यानं मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना अखेर न्याय मिळाला. बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने दहा लाख रुपये मदत वितरित केली आहे”, अशा आशयाचं राजेश टोपे यांनी ट्विट केलंय.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांचे आभार मानले.
Great information! I??ve been looking for such as this for a little bit now. Thanks!
891435 42120The next time Someone said a weblog, I hope that it doesnt disappoint me just as much as this. Come on, man, I know it was my choice to read, but When i thought youd have some thing intriguing to say. All I hear is truly a handful of whining about something you can fix in the event you werent too busy searching for attention. 216255