सोलापूर : औरंगाबाद येथे 12 ते 16 डिसेंबर 2021 रोजी होणा-या चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व सोलापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या वतीने 4 ते 5 डिसेंबर 2021 रोजी बास्केटबॉल निवड चाचणी ( इनडोअर स्टेडियम अश्विनी हॉस्पीटल जवळ) सोलापुरात घेण्यात आली.
शिवछत्रपती पुरस्कार विजेते हाजीमंलग नदाफ, एम.शफी शेख, सहसचिव बास्केटबॉल संघटना व राष्ट्रीय खेळाडूं कु.क्रांती बनकर यांनी संघाची निवड केली. संघाचे सराव शिबीर दिनांक 6 ते 10 डिसेंबर 2021 दरम्यान संपन्न झाले.
शिबीराचे प्रशिक्षक म्हणून एम.शफी व सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नितीन चपळगांवकर यांनी काम पाहिले.
जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर संघाला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी खेलो इंडिया अंतर्गत कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल या खेळाचे कार्यासन अधिकारी सत्येन जाधव यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रदर्शन एम.शफी शेख यांनी केले.
* संघातील खेळाडू पुढील प्रमाणे
संघ :- 1.वैष्णवी धप्पाधुळे 2.अदिती काकडे 3.तनया अक्कलकोटे 4.अन्वेशा घुमे 5.मुक्ता मोरे 6.अजिता खमितकर 7.सृष्टी ढाकरे 8.अमिता चव्हाण 9.अनुष्का घोडके 10.समिक्षा तोरा 11.वैभवी काळे 12.दिव्याराणी माने
* प्रशिक्षक :- श्री.एम.शफी शेख
सहाय्यक प्रशिक्षक :- श्री.नितीन चपळगांवकर
व्यवस्थापक :- सौ.वलजा घुमे
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* वेळापूरचा राहुल सावंत व वाडीकुरोलीची प्रीती काळे जिल्हा खो खो संघाचे कर्णधार
सोलापूर : वेळापूरचा राहुल सावंत व वाडीकुरोलीची प्रीती काळे यांच्याकडे वरिष्ठ गट जिल्हा खो खो संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले.
वेळापूर येथे आजपासून म्हणजे ११ ते १३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेसाठी असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण यांनी जिल्हा संघ जाहीर केले. संघास असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, असोसिएशनचे खजिनदार श्रीरंग बनसोडे, उत्कर्ष क्रीडा मंडळाचे खजिनदार उमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते. दोन्ही संघास न्यू सोलापूर खो खो क्लबच्या वतीने कीट देण्यात आले. आपुलकी युथ फाऊंडेशनचे संस्थापक मेहुल भुरे, धर्मराज कोळी व न्यू सोलापूर खो खो क्लबचे सचिव प्रथमेश हिरापुरे यांच्या हस्ते खो खोचे कीट देण्यात आले.
* संघातील अन्य खेळाडू :
– पुरुष : शफुर पठाण, रामजी कश्यप, हबीब शेख, विनीत दिनकर, निखील कापुरे, जुबेर शेख, अक्षय इंगळे, राकेश राठोड,सौरभ चव्हाण, साहिल कादर, आशिष चव्हाण. प्रशिक्षक : अजित शिंदे. व्यवस्थापक : आनंद जगताप.
– महिला : अमृता माने, संध्या सूरवसे,रोहिणी काळे, साक्षी काळे, शिवानी येड्रावकर, प्रणाली काळे,अर्चना व्हनमाने, सादिया मुल्ला, अमृता शिंदे, अश्विनी बनकर, ऋतुजा हाके. प्रशिक्षक : अतुल जाधव.