नवी दिल्ली : नवी टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज क्रिकेट सामन्याची वाट प्रत्येक क्रिकेट चाहता पाहत असतो. अशातच युएईमध्ये 19 वर्षांखालील आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडियाच्या अंडर 19 टीमची या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात ही 23 डिसेंबरपासून करणार आहे. पहिला सामना हा यूएई विरुद्ध खेळवण्यात येणार आहे. तर यानंतर 25 डिसेंबरला टीम इंडिया आणि पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे.
या दोन्ही टीममधील सामना म्हणजे थरार, हमरीतुमरी, हायव्होल्टेज ड्रामा असं समीकरण हे गेल्या अनेक वर्षांपासून ठरलेलं आहे. यो दोन्ही संघातील सामन्यांची क्रिकेट चाहते आवर्जून वाट पाहत असतात. नुकत्याच झालेल्या टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये दोन्ही संघ आमनेसामने भिडले होते. यावेळेस पाकिस्तानने टीम इंडियावर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. यानंतर आता पुन्हा हे दोन्ही संघ आमनेसामने भिडणार आहेत.
यूएईमध्ये 19 वर्षांखालील आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेनिमित्त हे दोन्ही कट्टर संघ आमनेसामने भिडणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या स्पर्धेत एकूण 8 संघ या विजेतेपदासाठी खेळणार आहेत. या एकूण 8 संघांना एकूम 2 गटात विभागण्यात आलं आहे. ए ग्रृपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि यूएईचा समावेश आहे. तर बी ग्रृपमध्ये श्रीलंका, बांगलादेश, कुवेत आणि नेपाळचा समावेश आहे. या दोन्ही ग्रृपमधील प्रत्येकी 2 संघ हे बाद फेरीत पोहचतील.
टीम इंडियाच्या अंडर 19 टीमची या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात ही 23 डिसेंबरपासून करणार आहे. पहिला सामना हा यूएई विरुद्ध खेळवण्यात येणार आहे. तर यानंतर 25 डिसेंबरला टीम इंडिया आणि पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे.
पाकिस्तानने टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये पराभूत केलं होतं. त्यामुळे 19 वर्षाखालील टीम इंडियाचे खेळाडू हे पाकिस्तानला पराभूत करत या पराभवाचा वचपा घेण्यासाठी सज्ज आहेत.
* आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा
19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
असा आहे संघ – हरनूर सिंग पन्नू, अंगक्रिश रघुवंशी, अंश गोसाई, एसके रशीद, यश धूळ (कर्णधार), अन्नेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधू, दिनेश बाना (यष्टीरक्षक), आराध्य यादव (यष्टीरक्षक), राजनगड बावा, राजवर्धन हंगरगेकर, गर्व सांगवन, रवी कुमार, रिषिथ रेड्डी, मानव पारख, अमृत राज उपाध्याय, विकी ओस्वाल, वासू वत्स.