मुंबई : आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया आणि परीक्षेतील मोठा गैरव्यवहार समोर आलाय. नुकतचं म्हाडाच्या परीक्षेचाही पेपर फुटल्याचं समोर आलं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. परीक्षा जाहीर करायच्या आणि नंतर त्या पेपरफुटीच्या नावाखाली रद्द करायच्या, अशा प्रकारचा काळा कारभार सातत्याने सुरु असल्याचा गंभीर आरोप केला.
मध्यरात्री म्हाडाच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा झाली. दरम्यान, सातत्यानं सुरु असलेल्या पेपरफुटीमुळे राज्यातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. अशावेळी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय.
राज्यात विविध केंद्रावर आज ‘म्हाडा’च्या भरतीचा पेपर होणार होता. दरम्यान, पेपर फुटण्या संदर्भातील तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंत पोहोचल्या. त्यानंतर आव्हाडांनी रात्री उशिरा ट्विट करून ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. एकूण 565 जागांसाठी ही परीक्षा होणार होती.
किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे?
राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही?
आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय !
नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका!दोषींवर कठोर कारवाई कराच!
पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही❓— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 12, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका फडणवीस यांनी घेतलीय. परीक्षा जाहीर करायच्या आणि नंतर त्या पेपरफुटीच्या नावाखाली रद्द करायच्या, अशा प्रकारचा काळा कारभार सातत्याने सुरु आहे. एक परीक्षा यांना धड घेता येत नाही. मागे आरोग्य विभागाच्या परीक्षेतही तीन-तीन वेळा परीक्षा रद्द झाल्या. पेपर फुटला आणि त्याची तार मंत्रालयापर्यंत गेलेली आहे. त्यामुळे या परीक्षांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरु आहे.
या सगळ्या कारभारामुळे राज्यातील तरुणांची प्रचंड ओढाताण सुरु आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी कडक कारवाई केली पाहिजे. यामध्ये कोण दोषी आहे? कुणावर तरी दोषारोप झाला पाहिजे. मात्र कुणावरही दोषारोप होत नाही. मंत्री नामानिराळे, मुख्यमंत्री नामानिराळे. हे चालणार नाही, याबाबत फार मोठा रोष आहे. यावर कडक कारवाई व्हावी. आमची तर मागणी आहे या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे’, अशी आक्रमक भूमिक देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.
काल शनिवारी रात्री जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर रितेश देशमुख आणि दोन एजंट विश्रांतवाडी परिसरात विद्यार्थ्यांना पेपर देण्यासाठी आले होते. ही माहिती मिळताच पुणे सायबर पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं आणि अटक केली. यापूर्वीही पुणे पोलिसांनी आरोग्य भरती प्रकरणात अनेक बड्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे. आरोग्य भरती आणि म्हाडा पेपरफुटीमध्ये दलालांचे काही समान धागेदोरे समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
I all the time used to read paragraph in news papers but now
as I am a user of net therefore from now I am using net for content, thanks
to web.
I visited multiple sites however the audio quality for audio songs present at this web site is
in fact wonderful.
Unquestionably imagine that that you stated. Your favorite justification seemed to be on the internet the easiest thing to remember of.
I say to you, I certainly get annoyed even as other people think about worries that they just don’t recognise about.
You controlled to hit the nail upon the top as well
as defined out the entire thing without having side-effects , people could take a signal.
Will likely be again to get more. Thanks
Paragraph writing is also a fun, if you be acquainted with after that you can write if not it is
complex to write.