पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ममता बॅनर्जीनी शरद पवारांना धक्का दिला आहे. ममतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील एकमेव आमदाराला फोडून मोठा धक्का दिला आहे. आमदार चर्चिल अलेमाव यांनी तृणमुल काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. अलेमाव यांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे तृणमूलमध्ये विलिनीकरण करावे, असे पत्र दिले. अलेमाव हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत.
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर विस्तारासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. पुढील वर्षी गोव्यात विधानसभा निवडणूक होत आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर ममता बॅनर्जींच्या गोव्यात दाखल झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील एकमेव आमदाराला फोडून मोठा धक्का दिला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गोव्याची धुरा पक्षाच्या आक्रमक खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांनीच नुकतीच गृहलक्ष्मी योजनेची घोषणा केली आहे. सध्या भाजप सरकारकडून महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. परंतु, त्यासाठी कमाल उत्पन्नाची मर्यादा आहे. तृणमूलची सत्ता आल्यानंतर ही रक्कम 5 हजार रुपये करून उत्पन्नाची मर्यादा काढून टाकण्यात येईल, असेही जाहीर करण्यात आले आहे.
ममता बॅनर्जी या आक्रमकपणे गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत उतरल्या आहेत. तृणमूल काँग्रेस गोव्यात सर्व 40 जागा लढवणार आहे. ममतादीदी आता गोव्याच्या दौऱ्यावर आहेत.
* गोव्यातील राष्ट्रवादीचे अस्तित्व नष्ट
काही दिवसांपूर्वी ममता या मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर दोनच आठवड्यात त्यांनी पवार आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गोव्यातील एकमेव आमदार चर्चिल अलेमाव यांना त्यांनी फोडले आहे.
अलेमाव यांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे तृणमूलमध्ये विलिनीकरण करावे, असे पत्र दिले. अलेमाव हे बेनोलिम मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांचा ममतांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश होणार आहे. अलेमाव हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या तृणमूल प्रवेशाने गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे.