13 जागांसाठी 48 उमेदवार निवडणूक रिंगणात
बार्शी : वैराग नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीमध्ये तिरंगी लढत होत आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी 21 उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्यामुळे नगरसेवक पदाच्या 13 जागांसाठी 48 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.
* प्रभागनिहाय, पक्षनिहाय उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक 1 : अतुल मोहिते (राष्ट्रवादी ), अतुल मलमे (अपक्ष ), मधुकर कापसे (भाजपा ), अरुण सावंत (शिवसेना ) प्रभाग क्रमांक 2 : निरंजन भूमकर(राष्ट्रवादी ), दत्तात्रय क्षिरसागर(भाजपा ), विकास मगर (अपक्ष ), प्रभाग क्रमांक 4 : अनुप्रिया घोटकर(राष्ट्रवादी ), कविता सोपल(शिवसेना ), शोभा पाचभाई(भाजपा ), उज्वला गाढवे(अपक्ष ), प्रभाग क्रमांक 5 : गुरूबाई झाडबुके (राष्ट्रवादी ), रेश्मा शिंदे (भाजपा ), तेजस्विनी मरोड (कॉंग्रेस ) प्रभाग क्रमांक 6 : आसमा मिर्झा(राष्ट्रवादी ), मुमताज पठाण (कॉंग्रेस), मनिषा तावसकर(भाजपा ) प्रभाग क्रमांक 7 : साधना गांधी(भाजपा ) पद्मिनी सुरवसे (राष्ट्रवादी ), कुसुम वरदाने (शिवसेना ), भाग्यश्री शिरसागर (अपक्ष ) प्रभाग क्रमांक 8 : राणी आदमाने (भाजपा ), कविता खेंदाड (राष्ट्रवादी ), सुप्रिया निंबाळकर (अपक्ष ) प्रभाग क्रमांक 11 : श्रीशैल भालशंकर(भाजपा ), विजयकुमार वाघमारे (वंचीत ), रेश्मा ठोंबरे(राष्ट्रवादी ), अतिश कांबळे (अपक्ष ) ,आकाश काळे (शिवसेना ), प्रभाग क्रमांक 12 :अक्षय ताटे(राष्ट्रवादी ), दिलीप गांधी (भाजप), दादासाहेब मोरे (शिवसेना ),कुलदीपसिंह बायस (अपक्ष ) चेतन लोकरे (रासप ),
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रभाग क्रमांक 13 : सुजाता डोळसे (राष्ट्रवादी ), रसीका लोंढे (भाजप), संध्याराणी अहिरे(शिवसेना ), प्रभाग क्रमांक 14 : विनोद चव्हाण(भाजप)अजय काळोखे (राष्ट्रवादी ),किशोर देशमुख(शिवसेना ), प्रभाकर क्षिरसागर ( वंचीत ), ताजुद्दीन शेख (बसपा), प्रभाग क्रमांक 16: सुलभा मगर (राष्ट्रवादी ), अर्चना माने रेड्डी(भाजप) ,शुभांगी पांढरमिसे (शिवसेना ), प्रभाग क्रमांक 17: शाहूराजे निंबाळकर(भाजपा ), विनायक खेंदाड(राष्ट्रवादी ), रवींद्र पवार(शिवसेना ) उभारले आहेत.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी सोमवारी माजी जि. प. सभापती मकरंद निंबाळकर यांचे बंधु राजेंद्र निंबाळकर यांनी प्रभाग क्र. 1 मध्ये भरलेला आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून मकरंद निंबाळकर यांच्या पत्नी सुप्रिया निंबाळकर यांना शिवसेनेने वार्ड क्र. 8 मध्ये पुरस्कृत केले आहे.
या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम, सहाय्यक निवडणूक अधिकारी विणा पवार, नायब तहसीलदार संजीवन मुढें हे कामकाज पाहत आहेत.