मुंबई : मद्यप्रेमींना ठाकरे सरकार आनंदाची बातमी देण्याची शक्यता आहे. कारण जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या या दुकानांमध्ये येणाऱ्या काळात वाईन विक्री करण्याची राज्य सरकार परवानगी देण्याच्या तयारीत आहे. ठाकरे सरकार याबाबत अधिसूचना काढणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे किराणा दुकान, बेकरी, डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये वाईन विक्री होऊ शकते.
राज्यात आता किराणा दुकान, बेकरीमध्ये वाईन मिळू शकेल. आता राज्य सरकार वाईनची विक्री किराणा दुकानामध्ये विकण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेणार आहे.
तसेच १ लीटरमागे १० रुपये अबकारी कर आकारण्यात येणार असल्यामुळे वाईन खरेदी करणाऱ्यांचे खिसे देखील गरम होणार आहेत. किराणा दुकान आणि बेकरीमध्ये वाईनची विक्री केल्यावर राज्यात किती खपत होते याबाबतची माहिती मिळणार आहे. राज्य सरकारच्या तिजोरतही ५ कोटी रुपयांचा निधी कर वाढवल्यामळे जमा होणार असल्यामुळे वाईनबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
राज्य सरकारकडून वाईनवरील नॉमिनल एक्साईज ड्युटी (अबकारी कर) वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाईनवर १० रुपयांचा कर आकारण्यात आला आहे. राज्यातील किराणा दुकान, बेकरीमध्ये वाईन विकण्याच्या परवानगीविषयी लवकरच राज्य सरकार नोटीस जारी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण तुलनेने कमी असते. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात बेकरीमध्ये आणि हॉटेलमध्ये पदार्थ बनवण्यासाठी वाईनचा वापर करण्यात येतो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यात २००० पासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणताही कर वाढवण्यात आला नव्हता. परंतु आता १० टक्के अबकारी कर वाढवण्यात आला आहे. यामुळे राज्य सरकारला ५ कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. तसेच उत्पादन शुल्क विभागाला महाराष्ट्रात वाईनच्या किती बॉटल्स विकल्या जातात याबाबत माहिती मिळेल असे मुख्य उत्पादन शुल्क विभागाचे सचिव वल्सा नायर सिंग यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात सध्या ७० लाख लिटर वाईनची वर्षाला खपत होते, वर्षाला १ कोटी लीटर खपत होण्यासाठी राज्य सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बारमध्ये वाईन सीलबंद असलेल्या बॉटलमधूनच विकता येणार आहे. दोन बारमधील अंतर २०० मीटर असावं हा नियम लागू होणार नाही. बीअरसारखेच बारमध्ये वाईन कॅनमध्ये देण्यात येऊ शकतात. अलिकेडच राज्यात आयात करण्यात आलेल्या व्हिस्कीवर ३०० टक्के लीटरवरुन १५० टक्के कर कमी करण्यात आला आहे. तसेच लवकरच वाईनबाबत राज्य सरकार आदेश जारी करण्याची शक्यता आहे.
* नवीन वर्षापासून स्वस्त दारू
दारू विक्रेत्यांनी सांगितले की, सरकारने विदेशी मद्यावरील टॅक्स कमी केला आहे. तो आता १५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. परंतु दुकानात अजूनही दारूचा जुनाच साठा असल्याने, दारू पुर्वीच्याच दराने विकली जात आहे. येत्या दहा दिवसांमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दुकानात नवीन स्टॉक येऊ शकतो. हा नवा मद्याचा साठा आल्यास दारू स्वस्त मिळेल. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनमुळे अनेक देशांनी प्रतिबंध लागू केले आहेत. त्यामुळे दारू आयात करण्यामध्ये अनेक निर्बंध येत असल्याचे त्यांनी सांगितले.
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या निर्णयामुळे दारू विक्रीमध्ये वाढ होऊन, महसूल वाढणार आहे. तसेच दारू स्वस्त झाल्यामुळे दारू तस्करीलादेखील आळा बसेल. दरवर्षी लाखो रुपयांच्या दारूची तस्करी होते. तस्करी थांबल्यास सरकारचा महसूल वाढू शकतो. दारूवरील टॅक्स कमी केल्याने सर्वच प्रकारच्या विदेशी मद्याचे दर हे ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाले आहेत.