सोलापूर – ट्रॅक्टरला कट मारल्याच्या किरकोळ भांडणातून सत्तुरने केलेल्या मारहाणीत अजित विलास कोडगे (वय ३० रा.तोंडले ता. माळशिरस) हा टँकर चालक जखमी झाला. ही घटना आज सोमवारी दुपारच्या सुमारास सिद्धेश्वर कारखाना येथील वजन काट्या जवळ घडली.त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अजित कोडगे हा त्याचा टँकर घेऊन कारखाना येथील काट्याजवळ वजन करण्यासाठी जात होता. त्यावेळी उस वाहतुकीचा एमएच१३-एजी-०६६८ या क्रमांकाच्या ट्रॅक्टर चालकाने आपल्या वाहनास कट मारल्याच्या कारणावरून भांडण केले. आणि त्याच्या हातावर सतुर ने मारहाण केली. अशी नोंद एमआयडिसी पोलिसात झाली आहे .
* जुळे सोलापुरात विवाहीत इसमाची गळफासाने आत्महत्या
सोलापूर – जुळे सोलापुरातील प्रसाद नगरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय विवाहित इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. २०) दुपारच्या सुमारास घडली.
ज्ञानेश्वर भागवत देवकते ( वय३२ रा. प्रसादनगर) असे मयताचे नाव आहे. त्याने आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरातील पहिल्या मजल्यावर छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार वाल्मिकी पुढील तपास करीत आहेत.
* अकोलेकाटी येथे महिलेस मारहाण तिघांविरुद्ध गुन्हा
अकोलेकाटी (ता.उत्तर सोलापूर) येथे वडीलाच्या भांडणात मधे का पडली. या कारणावरून काठी दगड आणि खुरपीने केलेल्या मारहाणीत सुचिता महादेव कदम (वय २७ रा.अकोलेकाटी) ही महिला जखमी झाली. ही घटना काल रविवारी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात तालुका पोलिसांनी संजय सुधाकर शिरसागर त्याचा मुलगा भैय्या (दोघे रा. साठेचाळ) आणि सुहास सावंत (रा. बीबीदारफळ) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार क्षीरसागर पुढील तपास करीत आहेत .
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* खेड येथे फायटर ने मारहाण ६ जणांविरुद्ध गुन्हा
खेड (ता.उत्तर सोलापूर) येथे घराजवळ मोठ्याने का ओरडता असे विचारल्याच्या कारणावरून लोखंडी फायटर, काठी आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत प्रथमेश बब्रुवान खोडके (वय ३०) त्यांची मावस बहीण रुपाली आणि मामा असे तिघे जण जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. जखमी प्रथमेश खोडके यांनी तालुका पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी रोहन भोसले, सुरज शिंदे, बाळू सुरवसे, अमोल भोसले, सुनील शिंदे आणि कपिल शिंदे (सर्व रा. खेड) अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार माळी पुढील तपास करीत आहेत.
* घोंगडे वस्तीत मजुराची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – घोंगडेवस्ती परिसरातील श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या शेतामध्ये एका झाडाला कृष्णा ईदप्पा कोळी (वय३८ रा. घोंगडे वस्ती,भवानी पेठ) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली.
कृष्णा कोळी हा गवंडी काम करीत होता. काल रात्री त्याने नेहमीप्रमाणे घरात जेवण करून बाहेर पडला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह घराजवळील शेतामध्ये बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या घटनेची नोंद जोडभावीपेठ पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार बुगड पुढील तपास करीत आहे.
Wiedergabe Safe, haben Spaß und genießen esten Faktoren dass der liefert jemand.
It’s a continuous action scene that just bores you half to death by the time the credits roll.
Spot on with this write-up, I actually believe this site requirements additional consideration. I’ll more likely once more to study additional, many thanks for that information.
When do you think this Real Estate market will go back right side up? Or is it still too early to tell? We are seeing a lot of housing foreclosures in Winter Springs Florida. What about you? Would love to get your feedback on this.
Awesome and really interesting post here. I very much enjoy sites that have to do with losing weight, so this is perfect to me to discover what you have here. Keep up the great work! how to lose weight fast
Thank you for the auspicious writeup. It in fact was
a amusement account it. Look advanced to more added agreeable from you!
By the way, how can we communicate?
Hi there! This post couldn’t be written any
better! Looking at this article reminds me of my previous roommate!
He always kept preaching about this. I am going to forward this article to
him. Fairly certain he’ll have a great read. I appreciate you for
sharing!
Sweet blog! I found it while browsing on Yahoo News. Do you have any
suggestions on how to get listed in Yahoo News?
I’ve been trying for a while but I never seem to get there!
Cheers
Ahaa, its pleasant dialogue on the topic of this
piece of writing at this place at this webpage, I have read all that, so now me also commenting at this
place.