सोलापूर : डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने सोलापुर चेस अकॅडमीने टाकळीकर मंगल कार्यालय येथे आयोजीत केलेल्या २० वर्षाखालील (ज्युनिअर) मुले व मुलींची जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटात अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय खेळाडू रिद्धी उपासे, आरोही पाटील, सृष्टी गायकवाड तसेच मुलांच्या गटात आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त मानस गायकवाड, प्रज्वल कोरे, शुभम बिराजदार यांनी प्रतिस्पर्ध्यांवर आकर्षक विजय मिळवीत विजयी सलामी दिली.
या स्पर्धेचे उद्घाटन स्वरा रियल इस्टेटच्या आदिती गोसावी व टाकळीकर उद्योग समुहाच्या व्यवस्थापिका नीलम उपाध्ये यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने झाली. यावेळी असोसिएशनचे सचिव सुमुख गायकवाड, अतुल कुलकर्णी, प्रमुख पंच उदय वगरे, गणेश मस्कले, प्रशांत पिसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठ खेळाडू संतोष पाटील यांनी केले. आपल्या मनोगतात कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदिती गोसावी यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळाडूंनी यश प्राप्त करून सोलापूरचे नाव उज्ज्वल करावे असे सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
स्पर्धेत सोलापुर शहरासह अकलूज, पंढरपूर, अक्कलकोट, मंगळवेढा, बार्शी आदी तालुक्यातील ५६ खेळाडूंनी सहभाग नोंदविला असुन चुरशीच्या लढती पहावयास मिळत आहे. तर प्रेयस वाघमारे, मनस्वी क्षीरसागर, विराग तुपकर, रेयांश दुलंगे, आयुष जानगवळी हे सात वर्षीय खेळाडू सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. सदर स्पर्धेतुन चार मुले व चार मुलींची निवड जळगाव येथे होणऱ्या राज्यस्तरीय निवड स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.
* सोलापूरच्या तीन खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
सोलापूर – डायरेक्ट हॉलिबॉल असोसिएशन यूएई यांनी दुबई येथे २३ ते २७ डिसेंबर दरम्यान आयोजित केलेल्या वर्ल्ड चॅम्पियन २०२१ आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सोलापूरच्या शोएब बेगमपुरे, बसवराज धायगोंडे व ओंकार चक्रनारायण यांची निवड झाली आहे, अशी महिती डायरेक्ट हॉलिबॉल असोसिएशनचे सचिव फैज अहमद बेगमपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेसाठी भारतीय संघ प्रशिक्षकपदी शरद कदम व व्यवस्थापक म्हणून विक्रम ॲवॉर्ड विजेते हेमलता छठवानी काम करणार आहेत. या पत्रकार परिषदेत बाबसाहेब कापसे, संजय सांवत, अहमद बेगमपुरे, अहमद शेख, अफजल शेख, अयाज शेख उपस्थित होते.