सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे अन्नातून झालेल्या अज्ञात विषबाधेमुळे दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुलींचा मृत्यू झाल्याने मरवडे गावावर शोककळा पसरली आहे. मृत मुलींचे वडील आबासाहेब व आई सुषमा यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत.
भक्ती आबासाहेब चव्हाण (वय 06) व नम्रता आबासाहेब चव्हाण (वय 04) असे या मृत दोन चिमुकल्याची नावे आहेत. आबासाहेब चव्हाण यांनी आपल्या भक्ती व नम्रता या लाडक्या लेकींसाठी मंगळवारी (ता. 21) मंगळवेढा येथील दुकानातून खाऊ आणला होता. हा खाऊ खाल्ल्यानंतर चव्हाण कुटुंबातील सर्वांनाच अस्वस्थ वाटू लागले. उपचारासाठी मंगळवेढा व पंढरपूर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले.
उपचारादरम्यान गुरुवारी (ता. 23) पहाटे आबासाहेब चव्हाण यांची मोठी मुलगी भक्ती हिचा मृत्यू मंगळवेढा येथील खासगी दवाखान्यात झाला तर दुसरी मुलगी नम्रता हिचा मृत्यू गुरुवारी (ता. 23) मध्यरात्री पंढरपूर येथील खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भक्ती ही मरवडे येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होती तर नम्रता ही बालवाडीत शिकत होती. भक्ती व नम्रता यांच्या गोड स्वभाव व हुशारीमुळे त्या सर्वांच्यात लाडक्या होत्या. भक्ती व नम्रता यांच्यावर मरवडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
एकाच कुटुंबातील दोघी बहिणींचा अन्नातील विषबाधेने मृत्यू झाल्याने मरवडेत खळबळ उडाली. या घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. मृत मुलींचे वडील आबासाहेब व आई सुषमा यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. या घटनेचा मंगळवेढा पोलिस ठाण्याकडून तपास केला जात आहे.
Yet were you aware this seduction strategies will not be only guys?