मुंबई : अभिनेता सलमान खानला सापाने दंश केल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर त्याला रूग्णालयातून डिस्चार्जही मिळाला. सापाला पाहून सलमानला मात्र घाम फुटला होता. मदत करा म्हणून तो फोनवर जोरजोरात ओरडला. त्यामुळे उशीरा रात्री त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, उद्या सलमान खानचा ५६ वा वाढदिवस आहे.
पनवेलच्या फार्म हाऊसवर हा प्रकार घडला. दरम्यान, सलमान खान पनवेल फार्म हाऊसवर मित्रांसोबत वाढदिवस साजरा करत होता. सलमान खान हा त्याच्या पनवेलमधीलमधील फार्महाऊसमध्ये असताना त्याला सर्पदंश झाला. दरम्यान, सलमानला साप चावल्यानंतर त्याला पहाटे ३.३० वाजता कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचारांनंतर सलमान खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
सलमान खानचे पनवेलमधील वाजेपूर येथे अर्पिता फार्महाऊस आहे. या फार्महाऊसवर सलमान विश्रांतीसाठी तसेच मित्रमंडळींसोबत येत असतो. दरम्यान, काल याच फार्महाऊसमध्ये सलमानला सर्पदंश झाला. त्यानंतर तातडीने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतर त्याची प्रकृती उत्तम असल्याने त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. मिळत असलेल्या माहितीनुसार सलमान खानला चावलेला साप हा बिनविषारी होता. त्यामुळे सलमानच्या प्रकृतीवर त्याचा फारसा विपरित परिणाम झालेला नाही.
काल शनिवारी ( ता. २५) मध्यरात्री तीनच्या सुमारास सलमान खानला एमजीएम रुग्णालय कामोठे याठिकाणी दाखल करण्यात आले होते. यावेळी सलमानला प्राथमिक उपचार देण्यात आले. यावेळी एमजीएमचे डॉक्टर सलमानवर लक्ष ठेवून होते. आज रविवारी सकाळी ९ च्या सुमारास सलमान खानला सोडून देण्यात आल्याची माहिती एमजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ सुधीर कदम यांनी दिली. सलमान एमजीएम रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय पथक यांच्यासोबत त्याच्या पनवेल मधील वाजेपुर येथील अर्पिता फार्म याठिकाणी थांबला आहे.
यावेळी एक सर्व सोयी सुविधायुक्त ऍम्ब्युलन्स देखील एमजीएम रुग्णालयाच्या वतीने फार्म वर ठेवण्यात आली असल्याची माहिती डॉ कदम यांनी दिली आहे.
सलमान खान नेहमीच त्याचा वाढदिवस अथवा इतर घरगुती कार्यक्रम पनवेल येथील अर्पिता फार्मवर साजरा करीत असतो. यावेळेला देखील ख्रिसमस, नववर्षाच्या सेलिब्रशनासाठी सलमान पनवेल मध्ये दाखल झाला होता. हा परिसर संपूर्ण जंगली असल्याने याठिकाणी वन्यजीव मोठ्या प्रमाणात आढळतात. तिथेच सलमानला रात्री १.३० च्या दरम्यान सर्पदंश झाला.