जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष चालू आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्या वाहनावर अज्ञात इसमांनी हल्ला केला. अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या दगडफेकीनंतर एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर खडसे समर्थकांची घराजवळ गर्दी जमली असून वातावरण तापले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे – खेवलकर आणि शिवसेनेचे आमदार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. हा वाद अजून संपलेला नाही तोच आता रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे- खेवलकर यांच्या वाहनावर आज सोमवार दि. २७ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता अज्ञात इसमांनी दगडफेक केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दगडफेक झाली त्यावेळी त्यांच्या कारमध्ये त्या स्वतः होत्या, अशी माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. दरम्यान, याबाबत पोलिस अधिक माहिती घेत असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला असल्याची माहिती मिळत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रोहिणी खडसे- खेवलकर या चांगदेव येथून हळदीचा कार्यक्रम आटोपून कोथळी येथील त्यांच्या घरी परतत होत्या. त्याचवेळी मुक्ताईनगर सूतगिरणी जवळ अज्ञात इसमांनी समोर येत त्यांच्या वाहनावर दगडफेक केली.
अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी खडसे या मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव इथं विवाहाच्या निमित्ताने हळदीच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. हळदीचा कार्यक्रम आटोपून त्या घरी परत येत होत्या. रोहिणी खडसे या आपल्या फॉर्च्युनर गाडीने येत असताना अचानक काही इसमांनी हल्ला केला.
रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याची राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करून तीव्र निषेध केला आहे.
रोहिणीताई खडसे यांच्या गाडीवर थोड्या वेळापुर्वी प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला,एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये ,मग ते कोणीही असो .जळगाव पोलिस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी @JalgaonPolice pic.twitter.com/IuHHp86RBw
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) December 27, 2021
‘रोहिणी खडसे यांच्या गाडीवर थोड्या वेळापुर्वी प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला,एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये, मग ते कोणीही असो. जळगाव पोलीस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी’ अशी मागणी चाकणकर यांनी केली.
या दगडफेकीत त्यांची फॉर्च्युनर कार (एम एच १९ सीसी १९१९ ) याची पुढील बाजूने काच फुटला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे अँड. रोहिणी खडसे या घाबरलेल्या असून कार्यकर्ते त्यांच्या मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांना घटनेची माहिती मिळाली आहे.
I discovered your site website on google and appearance several of your early posts. Always maintain inside the really good operate. I just now additional your Rss to my MSN News Reader. Seeking forward to reading more on your part at a later time!…
Making sure you know all about News is just here.
This is actually a good influencing view on this particular idea. And I’d like you to know that I’m really glad you shared your thoughts plus knowledge and I find that i agree. I truly truly appreciate the straightforward writing along with the focus you have invested writing this posting. Loads of thanks yous for that good work plus very good luck with the website, I most certainly will be awaiting new topics within the future.
You actually make it seem really easy along with your presentation however I find this topic to be really one thing that I think I would never understand. It seems too complicated and very wide for me. I’m looking ahead for your subsequent publish, I’ll try to get the cling of it!
скільки триватиме війна в україні 2022 коли закінчиться війна в україні в той день коли закінчиться війна
213534 36090whoah this blog is magnificent i enjoy reading your posts. Keep up the excellent function! You know, lots of men and women are seeking around for this information, you could aid them greatly. 557490
Главный герой
462235 522825Definitely pent topic matter, appreciate it for selective details . 612436