Wednesday, May 18, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर विजयी : ५४ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

Surajya Digital by Surajya Digital
December 28, 2021
in Hot News, खेळ
3
महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर विजयी : ५४ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जबलपूर : ५४ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २६ ते ३० डिसेंबर या कलावधीत एमएलबी खेळ परिसर, राईट टाऊन, जबलपूर, मध्य प्रदेश येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेत आज दुसर्‍या दिवशी पुरुषांमध्ये महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशवर, कर्नाटकाने त्रिपुरावर व कोल्हापूराने उत्तराखंडवर मोठे विजय मिळवले. महिलांमध्ये केरळने गोव्यावर, कोल्हापूरने बिहारवर तर कर्नाटकाने उत्तराखंड वर सहज विजयश्री प्राप्त केली.

महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ‘ब’ गटातील हिमाचल प्रदेशवर २४-०८ असा एक डाव १६ गुणांनी धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या प्रतिक वाईकर (३:०० मि. संरक्षण व २ गडी), अनिकेत पोटे (२:४० मि. संरक्षण व ३ गडी), कर्णधार सुयश गरगटे (२:०० मि. संरक्षण व ३ गडी), गजानन शेगाळ (२:०० मि. संरक्षण) व मिलिंद कुरपे (४ गडी) यांनी अष्टपैलू खेळ करत मोठ्या विजयात बहुमोल वाटा उचलला. पराभूत हिमाचलच्या रोहित वर्मा व राहुलने थोडाफार प्रतिकार केला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पुरुषांच्या ‘क’ गटातील कोल्हापूराने उत्तराखंडवर ३१-१० असा एक डाव २१ गुणांनी मोठा विजय प्राप्त केला. या सामान्यत कोल्हापूरच्या रोहण शिगटे (२:१० मि. संरक्षण व ८ गडी), अवधूत पाटील (२:३० मि. संरक्षण व ३ गडी) व अविनाश देसाई (१:५० मि. संरक्षण व ४ गडी) यांनी चौफेर खेळाचे प्रदर्शन केले सहज विजय मिळवला तर पराभूत उत्तराखंडच्या कोणत्याच खेळाडूला उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही.

महिलांमध्ये ‘फ’ गटातील कर्नाटकने उत्तराखंडवर १५-०१ असा डावाने एकतर्फी विजय साजरा केला. कर्नाटकच्या के. आर. तेजस्विनीने पहिल्या डावात नाबाद ९:०० मि. संरक्षण केल्याने कर्नाटकला मोठा विजय साजरा करता आला. त्यांच्याच बी. चित्राने दुसर्‍या डावात नाबाद ६:४० मि. संरक्षण व ३ बळी मिळवताना तेजस्विनीला उत्कृष्ट साथ दिली तर एल. मोनिका (५ बळी) के. आर. दिव्या (४ बळी) यांनीही विजयात महत्वाची कामगिरीची नोंद केली. उत्तराखंडच्या अंजु आर्या व भारती गिरी यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.

महिलांच्या ‘ग’ गटात केरळने गोव्यावर १२-०३ असा एक डाव ९ गुणांनी पराभव केला. केरळच्या अपर्णाने (४:३० मि. संरक्षण) करत विजयात मोलाचा वाटा ऊचलला. तर पराभूत गोव्याच्या कविता देविदास ( १:५०, १:१० मि. संरक्षण) व कर्णधार प्रमिता वेळीप (१:३० मि. संरक्षण व २ बळी) यांनी दिलेली जोरदार लढत अपयशी ठरली.

खेळातील डावासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

इतर निकाल :

पुरुष विभागात कर्नाटकने त्रिपुरावर १९-०६ तर महिला विभागात कोल्हापूराने बिहारवर ३४-११ असा विजय साजरा केला.

Tags: #Maharashtra #Karnataka #Kolhapur #won #National #Championship #Kho-Kho#महाराष्ट्र #कर्नाटक #कोल्हापूर #विजयी #राष्ट्रीय #पुरुष-महिला #अजिंक्यपद #खो-खो #स्पर्धा
Previous Post

राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला

Next Post

पुणे विभागातील मुदत संपलेल्या ४२ नगरपरिषदेवर, सोलापुरातील नऊ नगरपालिकेवर प्रशासक

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
बुलढाण्यात मतदान केंद्रावर दोन गटात जोरदार राडा, दहा लाखांचा गांजा जप्त

पुणे विभागातील मुदत संपलेल्या ४२ नगरपरिषदेवर, सोलापुरातील नऊ नगरपालिकेवर प्रशासक

Comments 3

  1. hotshot bald cop says:
    3 months ago

    Greetings I am so grateful I found your weblog, I really found you by error, while I was browsing on Google for something else, Anyways I am here now and would just like to say kudos for a remarkable post and a all round entertaining blog (I also love the theme/design), I don’t have time to browse it all at the moment but I have bookmarked it and also included your RSS feeds, so when I have time I will be back to read a great deal more, Please do keep up the awesome jo.|

  2. DevOps Latest Trends says:
    2 months ago

    771991 58095Hi there! Excellent post! Please do tell us when I could see a follow up! 794757

  3. kardinal stick says:
    2 months ago

    981834 262567i would have to make much more christmas cards becuase next month is december already- 193676

वार्ता संग्रह

December 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Nov   Jan »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697