कणकवली : भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या (29 डिसेंबर) सुनावणी होणार आहे. संतोष परब हल्ल्याप्रकरणी त्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. नितेश राणेंच्या बाजूने वकील संग्राम देसाई यांनी युक्तीवाद केला. मात्र कामकाजाची वेळ संपल्यामुळे उद्या दुपारी 2.45 वाजता सुनावणी होणार आहे. दरम्यान कणकवलीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नितेश राणे यांच्याशिवाय सामोरं जायची तयार ठेवा, असे राणे यांनी म्हटले आहे. शिवसैनिकांवरील हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ठाकरे सरकारकडून सर्व ताकद पणाला लावण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी हे वक्तव्य केले आहे.
संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांचा काही संबंध नाही, तसेच एखाद्या व्यक्तीला साधं खरचटलं असेल तर 307 सारखं कलम लावलं जातं असेल तसेच आमदार नितेश राणे यांचा मारहाणीत सहभाग नसताना त्यांना आरोपी केले जात आहे ही बाब चुकीची आहे. आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात दाद मागू, असेही राणे यांनी आज स्पष्ट केले.कणकवली येथील प्रहार भवन येथे राणे यांनी पत्रकार पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संतोप परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर नितेश राणे यांच्यावर आरोप झाले आहेत त्यानंतर केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि त्यांनी नितेश राणे कुठे आहेत मला माहितीये पण मी का सांगू? त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येत असल्याचं राणे म्हणाले. नितेश राणेंना अटक करण्यासाठी पोलिस यंत्रणा शोध घेत असतानाच मुलगा कुठे आहे? हे सांगण्यास नारायण राणे यांनी नकार दिला आहे.
राणे म्हणाले, सिधुदुर्गात असं काय घडलं आहे की राज्यातील पत्रकार, राज्याचे पोलीस संचालक, अतिरिक्त संचालक येथे येत आहेत. तसेच राज्यभरातील पोलीस यंत्रणा सिंधुदुर्गात का आणण्यात आली आहे. साधं खचटल्यासारखी घटना असताना एवढी वातावरण निर्मिती का केली जातेय. हा सगळा सत्तेचा दुरूपयोग आहे. कणकवलीत मारहाणीची घटना झाली. त्यात नितेश राणेंचा सहभाग नव्हता. मात्र, जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना डांबून ठेवण्यासाठी 307 कमलाचा वापर होतोय, असेही राणे म्हणाले.
* म्याँव – म्याँव असंसदीय शब्द नाही
“विधिमंडळात नितेशनं म्याँव म्याँव केलेलं नाही. तो काही असंसदीय शब्द नाही. मग तुमची काय हरकत आहे. मांजराचा आवाज कोण काढतं की ज्यामुळे संताप झाला? आदित्य ठाकरेंचा आणि मांजराचा संबंध आहे का? वाघाची मांजर कधी झाली? त्याच वेळी कुणी अजून कसला आवाज काढला असता, तर ते तसेच आहेत का? मांजरीचा आवाज काढला म्हणून राग का यावा?” असा सवाल नारायण राणेंनी केला. “मी अन्याय सहन करणाऱ्यातला नाही. विधिमंडळात सगळ्याच चांगलं काम नितेश राणे करतो आहे”, असं कोतुक देखील नारायण राणेंनी केलं.
I have been absent for some time, but now I remember why I used to love this website. Thank you, I will try and check back more frequently. How frequently you update your website?