बार्शी : बार्शी – तुळजापूर रस्त्यावरील नागोबा चौकात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिला गंभीर जखमी होवून मयत झाली. तर दुचाकीचालक आणि ट्रकचालक जखमी झाले.
व्दारका तानाजी खुने (वय 60, रा- गडपाटी ता.जि. उस्मानाबाद) असे या अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मयत महिलेचा मुलगा प्रशांत तानाजी खुणे याने दिलेल्या फिर्यादीवरून वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
द्वारका खुणे या आपले जावई चंद्रकांत लक्ष्मण जाधव (वय-40 ) यांच्या दुचाकीवर बसून सुर्डी येथे नातेवाइकाच्या लग्नासाठी जात होत्या. त्या उस्मानाबाद वरून गौडगाव जवळील नागोबा चौकात आल्या असता तुळजापूर कडून भरधाव वेगाने आलेल्या ट्रक ने (क्रमांक एम एच 13, बी 4964 ) त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यामुळे त्या व जावई चंद्रकांत जाधव दुचाकीवरून फेकले गेले. दोघांच्याही डोक्याला आणि अंगावर जखमा झाल्या. त्यात त्या मृत्यू पावल्या तर चंद्रकांत जाधव यांच्यावर उपचार सुरु आहेत.
ट्रक चालक उमेश दत्तात्रय गुडे (वय-40 रा .आवार पिंपरी ता . परांडा जि. उस्मानाबाद) हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्या विरोधात वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
● शहर पोलीस आयुक्तालयातील 67 अंमलदारांच्या अंतर्गत बदल्या
सोलापूर :- सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील 1 पोलीस उपनिरीक्षक आणि 67 पोलीस अंमलदारांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्याचा आदेश पोलीस आयुक्त हरिष बैजल यांनी दिला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शहर गुन्हे शाखेतून नियंत्रण कक्षात अवघ्या 15 दिवसांपूर्व बदलून आलेले पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांना पुन्हा गुन्हे शाखेत नियुक्त केल्याचा आदेश पोलीस आयुक्तांनी दिला तर शहर पोलीस आयुक्तालयातील सदर बझार, सलगरवस्ती, विजापूर नाका, एमआयडीसी, फौजदार चावडी, जेलरोड, जोडभावी पेठ, पोलीस मुख्यालय आणि शहर वाहतुक शाखा यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई अशा जवळपास 67 पोलीस अंमलदारांना प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदलण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे.
महिला पोलीस अंमलदारांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मुख्यालयातील अनेकांना चांगल्या पदावर नियुक्ती मिळाली तर चांगल्या पदावरील अनेकांना मुख्यालयाचा रस्ता दाखवण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखा आणि सदर बझार पोलीस ठाणे यामध्ये अनेकांना नियुक्ती देण्यात आली आहे. या बदल्याच्या आदेशाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात चांगलीच चर्चा रंगली आहे.
● मावा विक्रीवर पोलीसांचा छापा ; दीड लाखाचा मुद्देमाल जप्त
सोलापूर : मावा बनवून विक्री करताना पोलिसांनी छापा टाकून कारवाई करीत दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी (27 डिसेंबर ) केली.
आसिफ इशाद मुजावर (वय- 35 , नवीन विडी घरकुल,अक्कलकोट रोड,सोलापूर) हा तंबाखुजन्य पदार्थ,सुपारी,मावा व इतर साहित्य मिक्स करून मावा तयार करीत असताना एकूण 1,50,600 रुपयांचा माल मिळुन आला असून, त्याला ताब्यात घेऊन माल जप्त करण्यात आला.
सोमवारी पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करीत गस्त घालत असताना पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत युनुरा मटन स्टॉल जवळ गाझी मोहल्ला बक्षी गल्ली पंजाब तालीम जवळ उत्तर कसबा सोलापूर येथे एका घराममध्ये तंबाखुजन्य पदार्थ, मावा असल्याची माहिती मिळाली होती.
त्या अनुषंगाने त्याठिकाणी दोन पंचासमक्ष छापा टाकला. त्यावेळी मुजावर हा मावा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मिक्स करत असताना मिळून आला. पोलीसांनी हि माहिती लगेचच अन्न व औषध प्रशासन कार्यालय येथील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावेळी अन्नपुरवठा निरीक्षक यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.