सोलापूर / पंढरपूर : आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनाला आले होते. परंतु, मंदिराच्या व्हीआयपी गेट समोर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राडेबाजीमुळे भाविकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी एकमेकांना इशाराही त्यांनी दिला. मंदिराच्या परिसरातच त्यांची ही भांडणे बराच वेळ चालली होती. मात्र त्यांच्या भांडणाचा भाविकांना विनाकारण त्रास सहन करावा लागला.
आचार्य तुषार भोसले यांनी काही दिवसांपुर्वी शरद पवार यांच्यावर वक्तव्य केले होते. त्यानंतर आज नव वर्षानिमित्त आचार्य तुषार भोसले पंढरपूरमध्ये श्री. विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यास आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस काही कार्यकर्ते हातात अबिर बुक्का घेऊन मंदिरा जवळ आले होते.
भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले पत्नी आणि आई समवेत आज पंढरपूरमध्ये दर्शनासाठी आले होते. श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत सरकारवर जोरदार टीका केली. दर्शन घेऊन बाहेर पडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी त्याठिकाणी तुषार भोसले यांच्याकडून शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी आले.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मंदिर परिसरात जोरदार घोषणाबाजी करीत राडा झाला. जवळपास 10 ते 15 मिनिटं हा प्रकार सुरू होता. याबाबत तुषार भोसले यांनी आपण कोणाचे नाव घेऊन टीका केली नाही, अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली. तर आम्ही अर्धवट माहिती घेऊन बोलणाऱ्या तुषार भोसले यांना शरद पवार यांची माहिती असावी यासाठी त्यांना ‘लोक माझा सांगाती’ हे पुस्तक भेट देण्यासाठी आलो होतो, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिली.
धक्काबुक्कीच्या व्हिडिओसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
परंतु, तुषार भोसले यांच्या अंगावर काळे टाकण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केला. या घटनेमुळे मंदिर परिसरात काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. याचा नाहक मनस्ताप देशभरातून आलेल्या भाविकांना सहन करावा लागला. काही दिवसांपूर्वी तुषार भोसले यांनी ट्विटरवरून एक टिपण्णी केली होती. मात्र काही वेळाने ते ट्विट त्यांनी काढून टाकले होते. या ट्विटनंतर सोशल मीडियावर तुषार भोसले यांना जाब विचारू अशा प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या. त्यानंतर हा प्रकार झाला.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विठुरायाच्या दारात घडलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या ड्रामेबाजीमुळे सर्वसामान्य भाविक आणि नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. विठ्ठल मंदिर परिसरात कोणतेही आंदोलन करण्यास मनाई असताना राष्ट्रवादी आणि भाजपचे पदाधिकारी मंदिराजवळ जमा होऊ लागल्यानंतर पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावीत मंदिर परिसर भाविकांसाठी मोकळा केला.
* काळे फासण्याचा प्रयत्न
तुषार भोसले बाहेर येत असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुढे सरसावले. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातच दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांना काळं फासण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केलाय. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडवल्याने हा प्रकार टळला गेल्याचेही बोलले जात आहे. यानंतर परिसरात बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
एकमेकांविरोधात घोषणाबाजी देत राष्ट्रवादी-भाजपच्या कार्यकर्त्यांना एकमेकांना इशाराही दिला. देशाच्या कानकोपऱ्यातून विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक येथे येत असतात. मात्र कार्यकर्त्यांच्या भांडणामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली. शेवटी मंदिराच्या प्रशासनाने मध्यस्थी घेऊन त्यांची भांडणे मिटवली.
* भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांची प्रतिक्रिया
भाजप नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत सोशल मिडियावर आपले मत व्यक्त केले आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीतल्या पराभवामुळे आलेल्या वैफल्यातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे कार्यकर्ते बाहेरच आलेले नाहीत. त्यामुळेच आमच्या आचार्य तुषार यांच्याशी गैरवर्तनाचा प्रकार घडलाय. या प्रकाराचा मी तीव्र निषेध करतो. तसेच संबंधितांवर सरकार कारवाई करणार की त्यांना पाठीशीच घालणार, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.