नवी दिल्ली : जम्मूतील कटरा येथे माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 20 भाविक जखमी झाले आहेत. यामध्ये पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख तर जखमी भाविकांना 50 हजार रुपये मदत पं. नरेंद्र मोदींनी जाहीर केली आहे. तसेच जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं सांगितले आहे.
जम्मू मधील कटरा येथील वैष्णोदेवी मंदिरामध्ये रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. सरकारकडून दुर्घटनेत मृत पावलेल्या भाविकांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्यात आली. तसेच मदतीसाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे. 01991-234804 01991-234053 असा नंबर आहे.
जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याचे सांगितले जात आहे. त्रिकुटा टेकडीवर असलेल्या मंदिराच्या परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहिती नुसार नवीन वर्षाच्या प्रारंभानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, चेंगराचेंगरी झाली.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मिळालेल्या वृत्तानुसार अधिका-यांनी सांगितले की अनेक लोक मृत आढळले आणि त्यांचे मृतदेह ओळख आणि इतर कायदेशीर औपचारिकतेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमींना माता वैष्णोदेवी नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसह इतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू झाल्यामुळे अत्यंत दु:ख झाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. शोकग्रस्त कुटुंबियांच्या सांत्वना केले आहे तसेच जखमी लवकर बरे होतील. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा, मंत्री जितेंद्र सिंह आणि नित्यानंद राय यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. मृतांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील लोकांचा समावेश आहे. याप्रकरणी अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे. तसेच प्रवासही बंद करण्यात आला आहे. PMO च्या वतीने ट्विट करून सांगण्यात आले आहे की, चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला PMNRF कडून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदतीची घोषणा केली.
जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या कार्यालयाने ट्विट केले की, चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि जखमींना 2 लाख रुपये मदत दिली जाईल. जखमींच्या उपचाराचा खर्च श्राइन बोर्ड उचलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. त्यांना घटनेची माहिती दिली. पंतप्रधानांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. माता वैष्णो देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल खूप दुःख झाले. मृतांच्या कुटुंबीयांना माझ्या संवेदना आणि जखमींसाठी प्रार्थना, असे ट्विट केलंय .