मुंबई : मुंबईत ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत आंदोलन करत असलेल्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हटवण्यात आले आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतीच नवी नियमावली जारी केली होती. त्यानुसार मुंबईत सार्वजनिक ठिकाणी सायंकाळी 5 ते पहाटे 5 पर्यंत जमावबंदी करण्यात आली आहे. जमावबंदीच्या कलम 144 अंतर्गत आता आझाद मैदानसुद्धा रिकामे करण्यात आले आहे. मैदानातील रात्रीचा मुक्कामावर आझाद मैदान पोलिसांनी निर्बंध लावल्याने आता एसटी कर्मचाऱ्यांनाही रात्र आता इतरत्र काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सध्यातरी आझाद मैदान रात्रीचे रिकामे झाले आहे.
मनपा आयुक्तांनी रात्रीचे निर्बंध घातल्याने आझाद मैदान रिकामे करावे लागले आहे. आता सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच आझाद मैदान सुरू राहणार आहे. ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मनपाने घेतल्याने संपकऱ्यांची स्वयंस्फूर्तीने मैदान रिकामे करून दिले असल्याचे भूषण बेलनेकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आझाद मैदान) यांनी सांगितलंय.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संप करत आहेत. संपाचं प्रमुख केंद्र मुंबईतील आझाद मैदान आहे. या मैदानावरूनच राज्यातील पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाते. सरकार आणि संपकरी कर्मचारी यांच्यात विलीनीकरण सोडून इतर सर्व मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघाला आहे. पण संपकरी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.
राज्यात सध्या कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्यात सरकार विविध निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे.
राज्यात सध्या नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येचा विचार करता सरकार आता गर्दीच्या ठिकाणी कठोर नियम लावणार आहे.
सरकारनं सध्या मुंबईमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू केल आहे. याच्याच परिणामी आझाद मैदानावर आंदोलन करत असणाऱ्या कर्माचाऱ्यांना आंदोलन स्थळ सोडावं लागणार आहे.
मुंबईमध्ये सायंकाळी पाच ते पहाटे पाच यावेळेत सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणाच्या सूचना देण्याता आल्या आहेत. परिणामी आझाद मैदानातील संपकरी कर्मचाऱ्यांना स्थळ सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. सरकारकडून आंदोलन स्थळावर कलम 144 लागू करण्यात आलं असलं तरी एसटी कर्मचारी आपलं आंदोलन चालू ठेवणार आसल्याची माहिती येत आहे.
कोरोनाची सर्व नियमावली पाळून आंदोलन करण्यात येणार असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. परिणामी आता कर्मचारी सकाळी पाच ते रात्री पाच यावेळेत आंदोलन करणार आहेत. दरम्यान, एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. सरकारनं विलीनीकरणाचा निर्णय हा न्यायालयाच्या निर्णयानंतर घेतला जाणारा असल्याचं स्पष्ट केलं आहे.