लातूर : ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची सर्वानुमते निवड झाली आहे. लातुरच्या उदगीर येथे हे साहित्य संमेलन होणार आहे. भारत सासणे हे मराठीतील एक महत्त्वाचे कथाकार म्हणून ओळखले जातात. सासणे यांना लेखनाबद्दल राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार, तसेच इतरही मानाचे व प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत.
संमेलनाच्या अध्यक्ष निवडीसाठी आज उदगीरमध्ये महामंडळाची एक बैठक पार पडली या बैठकीत प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. चार महिन्याच्या आत पुढील साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती नाशिक येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनावेळी देण्यात आली होती. त्यामुळे कोरोना परिस्थिती पाहता येता तीन महिन्यात या संमेलनाची तारीख पक्की होईल. भारत सासणे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे त्यांचे अभिनंदन केले जात आहे. सासणे यांनी मराठी साहित्यविश्वात एक मोठं योगदान दिले आहे.
वर्षभरापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शेवट वादानेच नाशिक येथे झाला होता. याच संमेलनात ९५ वे संमेलन उदगीर (जि. लातूर) येथे होणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली होती.
दरम्यान ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद कोणाला मिळणार याची चर्चा सुरु होती. दरम्यान, या चर्चांवर पूर्णविराम लागला असून ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड करण्यात आली आहे. उदगीर येथे महामंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी सर्वांनुमते ही घोषणा करण्यात आली.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
भारत सासणे हे वैजापूरला ४ एप्रिल २०१० रोजी झालेल्या ५ व्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते. बहिर्जी शिक्षण संस्थेतर्फे वसमत येथे ९ आणि १० नोव्हेंबर २०१४ या काळात आयोजित केलेल्या ३५व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपददेखील भारत सासणे यांच्याकडे होते.
याशिवाय नाशिकच्या उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचे जळगाव येथे १४ फेब्रुवारी २०१६ रोजी भरलेल्या एक दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे समारोपीय सत्राचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषवलं आहे. सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्यावतीने समग्र साहित्य सेवेबद्दल सूर्योदय पुरस्कारदेऊनही सासणे यांना गौरवण्यात आलं आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी गेली अनेक वर्षे भारत सासणे यांचे नाव चर्चेत होते. मात्र गेली दोन अध्यक्षपदाच्या निवडीत फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि डॉ. जयंत नारळीकर यांचे नाव निश्चित झाले. त्यामुळे भारत सासणे यांचे नाव मागे पडले. मात्र उस्मानाबाद इथे पार पडलेल्या संमेलनात अध्यक्ष असलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि नुकत्याच नाशिक साहित्य संमलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर सक्रिय न दिसल्याने यापुढे चालत्या-बोलत्या अध्यक्षाची नेमणूक करा असे महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी बजावून सांगितले. त्यानुसार सासणे यांची निवड झाली.