नागपूर : जिल्ह्यातील कोटोल तालुक्यातल्या ईसापुर घुबडमेट येथे आज रविवारी (२ जानेवारी) पहाटे चारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. बोलेरो पिकअप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली. या अपघातात 4 महिला मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर यात 5 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेत, मनीषा कमलेश सलाम (वय ३८), मजुषा प्रेमदास उईके (वय ४०), कलाताई गंगांधर परतेती (वय५०), यांचा जागीच मृत्यू झाला तर मंजुळा वसंता धुर्वे (वय ५०) यांच्यावर नागपूर येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जखमी वृंदा अशोक दूधकवले (वय १७), चैतानी स्लॅम (वय ३०), कलावंता संतोष पेंदाम (वय ५५), येनुबाई दूधकवळे (वय ३०), लक्ष्मीबाई तायडे (वय ३४ सर्व राहणार अंबाडा सोनक) व विशाल बॉंदे (वय३५ मोहपा), आकाश बत्तासे मोहपा हे गंभीर जखमी झाले, सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील ईसापूर-घुबडमेट रस्त्यावर ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती कुटुंबियांना कळाल्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. चार महिलांना अपघात जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
आज पहाटे काटोल तालुक्यातील ईसापुर – घुबडमेट रस्त्यावर हा अपघात झाला आहे. या परिसरातील सध्या संत्र्याच्या बागेत संत्री तोडण्याच्या काम सुरू आहे. त्यासाठी या महिला मजूर एका बोलेरो पिकअप व्हॅनने कामासाठी जात असल्याची माहिती आहे.