पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जानेवारी महिन्यात घेतल्या जाणाऱ्या तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर झाले आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 आता 23 जानेवारी रोजी होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 आता 29 जानेवारीला होणार आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा 2020, पेपर क्रमांक 2, पोलिस उपनिरीक्षक परीक्षा आता 30 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे.
कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारास परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूनं परिक्षेच्या वेळापत्रकात बदल केला होता. त्यात आयोगाने 2 जानेवारी 2022 ला होणारी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकली होती. त्यानंतर वयोमर्यादा उलटून गेलले विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.
https://twitter.com/mpscexams/status/1477936817034858498?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1477936817034858498%7Ctwgr%5Ehb_1_7%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आता पुन्हा आयोगाने पुन्हा एकदा परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. या प्रकारे या तीन या परीक्षांचे सुधारित वेळापत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे.
एमपीएससीच्या पोलीस निरीक्षक पदासाठी येत्या 29 जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र याच दिवशी आता म्हाडाची लांबवण्यात आलेली परीक्षादेखील घेतली जाईल. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जाणार आहेत. यामुळे आता राज्यातील विद्यार्थी गोंधळात पडला आहे.
दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्यामुळे तारखा जाहीर करताना इतर विभागाचं वेळापत्रक लक्षात घेतलं जातं नाही, असा आरोप केला जातोय. राज्यभरात 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारीदरम्यान म्हाडाची परीक्षा होत आहे. पेपर फुटल्याचे आरोप झाल्यामुळे म्हाडाची 12 ते 20 डिसेंबर 2021 दरम्यान होणारी परीक्षा रद्द करण्यात आली होती.
I got what you mean , saved to fav, very nice internet site .
Uncertain concerning your own text. It appears to be okay, yet some thing can be missing