नवी दिल्ली : टाटा मोटर्स ही भारतामधील सर्वाधिक वाहन विक्री करणारी कंपनी बनली आहे. डिसेंबरमध्ये टाटाच्या 35 हजार 300 वाहनांची विक्री झाली आहे. त्यापाठोपाठ हुंडाईच्या एकूण 32 हजार 312 वाहनांची विक्री झाली आहे. तसेच टाटा कंपनीने 2021 वर्षामध्ये 3.31 लाख वाहनांची विक्री केली आहे. दरम्यान, 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये टाटाच्या गाड्यांच्या विक्रीमध्ये 44 टक्क्यांची वाढ झाली आहे.
भारताला तीन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात टाटा समूह महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांनी व्यक्त केला. भारताच्या उत्कर्षांत आपला समूह ठोस भूमिका बजावू शकतो. 2024 पर्यंत 3 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या महत्त्वाकांक्षेसह, आपण स्वत:ला अधिक सुलभ, अधिक टिकाऊ आणि अधिक प्रगत बनविण्याच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात टाटाच्या 35,300 वाहनांची विक्री झाली, तर त्याच कालावधीमध्ये हुंडाईच्या एकूण 32,312 वाहनांची विक्री झाली आहे. टाटा मोटर्सच्या वाहनांची विक्री वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे टाटाची एसयूवी नेक्सऑन ही कार आहे. टाटा मोटर्सने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये तब्बल 99,002 वाहनांची विक्री केली. विक्रीच्या बाबतीमध्ये टाटाने सर्व वाहन निर्मिती कंपन्यांना मागे टाकले आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
डिसेंबर 2021 चा कार विक्रीचा अहवाल नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये ह्युंदाई कंपनीच्या गाड्यांच्या विक्रीत लक्षणीय घट झाली आहे तर दुसऱ्या बाजूला टाटांच्या गाड्यांच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ झाल्याने टाटांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे.
ह्युंदाई मोटर्स कंपनीने एकूण 32 हजार 312 गाड्यांची विक्री केली आहे. याउलट टाटांच्या टाटा मोटर्स कंपनीच्या गाड्यांच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसत आहे. टाटा मोटर्स कंपनीने एकूण 35 हजार 299 कार विकल्या आहेत. टाटा मोटर्स कंपनीच्या कार विक्रीमध्ये तब्ब्ल 50 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
कंपनीने 2021 वर्षामध्ये 3.31 लाख वाहनांची विक्री केली, वार्षिक आधारावर कोणत्याही वाहन निर्मिती कंपनीच्या विक्रीपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. मागील वर्षी कंपनीच्या विक्रीमध्ये तब्बल 50 पटीने वाढ झाली आहे. डिसेंबर 2020 मध्ये टाटा मोर्टर्सने 23,545 वाहनांची विक्री केली होती. 2020 च्या तुलनेमध्ये गाड्यांच्या विक्रीमध्ये 44 टक्क्यांची वाढ झाली आहे. या बाबत कंपनीकडून नुकतीच आकडेवारी जाहीर करण्यात आली.
दरम्यान दुसरीकडे टाटाच्या इलेक्ट्रिक वाहनांना देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. कंपनीने मागील वर्षी 2021 मध्ये 2,215 वाहनांची विक्री केली होती. तर 2020 मध्ये 418 वाहनांची विक्री केली होती. याचाच अर्थ गेल्या वर्षभरात इलेक्ट्रिक वाहनाच्या विक्रीमध्ये तब्बल 439 पटींची वाढ झाली आहे. कंपनीने गेल्या तिमाहीमध्ये 5,592 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते. तसेच सेमीकंडक्टरचा पुरवठा देखील मंदावला होता. याचा परिणाम हा कार निर्मिती आणि विक्रीवर झाला. मात्र आता वातावरण हळूहळू सामान्य होत असून, पुढील काळात कार विक्रीमध्ये आणखी वाढ होऊ शकते अशी अपेक्षा कंपनीला आहे.